शांती नगर येथे रोडवर घाणीचे साम्राज्य मात्र नगरसेवक व ठाणे महानगरपालिकेचे दुर्लक्ष

शांती नगर येथे रोडवर घाणीचे साम्राज्य मात्र नगरसेवक व ठाणे महानगरपालिकेचे दुर्लक्ष

शांती नगर येथे रोडवर घाणीचे साम्राज्य मात्र नगरसेवक व ठाणे महानगरपालिकेचे दुर्लक्ष

✍सुहास पाटील✍
ठाणे शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
9321388971

ठाणे : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, शांतीनगर येथील रोड च्या बाजूला कचरा टाकण्यात येतो व त्यामुळे जाताना किंवा परत येताना सर्व शांतीनगर वासीयांना रोजच्या रोज या कचऱ्यातून जावे व यावं लागते असे हे चित्र आहे (शांतीनगर प्रवेशद्वार माहाविस जिमजवळ, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम)
आताही आपण या भागात राहणाऱ्या लोकांवर दोषारोप करत आहोत पण खरे सत्य काही वेगळेच आहे. ज्यांनी आमच्या परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी दिली आहे तेच आमचा परिसर घाण करत असल्याचे चित्रात दिसत आहे. या बाबत वरिष्ठांना विचारणा केली असता त्यांनी उत्तर दिले की त्यांच्याकडे कचरापेटी नाही त्यामुळे त्यांना हे करावे लागले आहे. याचा अर्थ ठाणे महानगरपालिकेत कचरा पेटी नसल्याने शांतीनगर व श्रीनगर येथे राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीयुक्त कचऱ्यातून जावे लागत असून त्याचा आरोग्यावर परिणाम होतो.
वाढदिवस, पूजा इत्यादी कार्यक्रमांना उपस्थित राहण्यापेक्षा या भागातील नेत्यांचे हे मत आहे की निवडणूक जवळ आल्यावरच तुम्ही हे करा. कृपया या वाढदिवस आणि पूजेमध्ये परिसराच्या विकासाच्या नावाखाली कमावलेला पैसा वाया घालवू नका. आमच्या परिसरात कचरापेटी व्यवस्थित करून काही चांगले काम केले तर बरे. असे शांतीनगर वासीयांची मागणी आहे .