महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांवर 31 तारखेच्या परिवहन मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या अलीमेटला भोकर आगार धुडकावून लावला

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांवर 31 तारखेच्या परिवहन मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या अलीमेटला भोकर आगार धुडकावून लावला

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांवर 31 तारखेच्या परिवहन मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या अलीमेटला भोकर आगार धुडकावून लावला

बालाजी पाटील
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
9420413391
9421808760

भोकर : -भोकर आगारातील कर्मचाऱ्यांनी गेली पाच महिन्यांपासून दुखावटा आंदोलन करीत आहेत. आजपर्यंत आमच्या एकून 115 बांधवांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले आहे. त्यामुळे आम्ही सर्व भोकर आगार कर्मचारी जो पर्यंत एस. टी .चे राज्य शासनात विलिनीकरण होत नाही तो पर्यन्त आम्ही दुखवटा आंदोलन माघार घेणार नाही व आमचा लढा न्यायलयीन लढा चालू आहे.व आमचे श्री सदावर्ते साहेब न्यायालयात लढा देत आहेत व आमची बाजू आजपर्यंत भक्कम आहे व आम्हाला आजपर्यंत मा न्यायालयाने दुखवटा बेकायदेशीर आहे असे कुठेही निर्देश दिले नाहीत. त्यामुळे आम्हाला न्यायालयावर व एस टी चे शासनात विलिनीकरण होईल असा विश्वास आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी 31 मार्च पर्यंत कामगारांना कामावर रुजू होण्याचा अल्टीमेट दिला आहे.परंतु भोकर आगार कर्मचाऱ्यांनी त्या अल्टीमेटम धुडकावून लावले आहे आज पर्यंत भोकर आगारातील कर्मचारी कामावर रुजू झाला नाही
राज्य शासनला एस टी कर्मचाऱ्यांना विलिनीकरणासाठी राज्याला तिजोरीत खडखडाट आहे असे परिवहन मंत्री म्हणतात परंतु आमदाराच्या पि ए ला पगार वाढ त्यांच्या चालकाला पगार वाढ तसेच 300 आमदारांना मोफत घर बांधून देण्यासाठी राज्याकडे पैसे आहेत आणि आमदारांना गाडी घेण्यासाठी 30 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज घेण्यासाठी पैसे आहेत या सर्व गोष्टी घेण्यासाठी पैसे आहेत हे चुकीचे आहे
हे ठाकरे सरकार लोकहितासाठी नसून ते स्वहितासाठी स्थापन झाले आहे काय असा प्रश्‍न आम्हाला पडला आहे.
आज भोकर आगार कर्मचारी यांनी दुखवटा मध्य ठाम आहे दिनांक 5 एप्रिल रोजी मुंबई हायकोर्ट येथे विलिनीकरण सुनावणी होणार आहे व या सुनावणीत आमच्याकडून निर्णय येईल असा विश्वास आहे आम्हाला न्याय मिळवून सदावर्ते साहेब देतील असा ठाम त्यामुळे आम्ही सर्व कामगार ठाम राहणार आहोत व त्यानंतर आम्ही कामावर जाणार आहोत
जोपर्यंत श्री सदावर्ते साहेब सांगत नाही तोपर्यंत दुखवटा आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार केला आहे
तसेच अजित पवार यांनी दिलेल्या अल्टीमेटला भीक घालत नाही. असे एस टी कर्मचाऱ्यांनी सागितले आहे
राज्य शासन आजपर्यंत अल्टीमेट शिवाय कर्मचार्‍यांना काहीच दिले नाही जी पगार वाढ दिली आहे ती फसवी पगारवाढ आहे. असे वीस वर्ष सेवा दिली आहे त्या कर्मचाऱ्यांना 2500 पगारवाढ दिला आहे ती 41 टके पगारवाढ कसी होते हा संशोधनाचा विषय आहे न्याय प्रविष्ट प्रकरण असताना त्याबद्दल अल्टीमेटम देणे हा मा. न्यायालयाचा अवमान करणे नाही का मा. कोर्ट जो निर्णय देतील ते आम्हाला मान्य असेल.