भारतीय बौद्ध महासभा चे राजुरा येथे धम्म उपासिका प्रशिक्षण शिबीर संपन्न
✍सौ हनिशा दुधे✍
बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
97642 68694
बल्लारपूर : – भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा(पश्चिम विभाग) अंतर्गत तालुका शाखा राजुरा च्या वतीने दि.20 ते 29 मार्च 2022 पर्यंत “सम्यक बुद्ध विहार, सोमनाथपुर वार्ड, राजुरा येथे धम्म उपसिका प्रशिक्षण शिबीर चे आयोजन करण्यात आलेले होते. दि 29 मार्च 2022 ला शिबीराचा समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला.
या शिबिरामध्ये असंख्य उपाशीकानी महिलांनी सहभाग घेऊन धम्माचे प्रशिक्षण घेतले. तसेच बामण वाडा येतील उपसिका उषा,सुषमा,मया,लता,उज्वला, मीनाक्षी,जिजाई,ललिता,सुजाता,आणि किसन बावणे,गिरिधर चंने यांनी भेट दिली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष आद.धर्मुजी नगराळे साहेब भा बौ म राजुरा तालुका अध्यक्ष होते.प्रमुख उपस्थितीमध्ये इंजी.नेताजी भरणे साहेब,जिल्हाध्यक्ष भा बौ म चंद्रपूर ,आद.समताताई लभाने,केंद्रीय शिक्षिका,आद.सपनाताई कुंभारे, जिल्हा उपाध्यक्ष, प्रचार व पर्यटन विभाग,आद.आद.सुजाताताई लाटकर,जिल्हा उपाध्यक्ष महिला विभाग तथा केंद्रीय शिक्षिका,आद.किशोरभाऊ तेलतुंबडे, सरचिटणीस, चंद्रपूर शहर विभाग, आद.कविताताई अलोने महिला सचिव,आद.संगिताताई अलोने,आद.अनुकलाताई वाघमारे,केंद्रीय शिक्षिका,आद.गोैतम चोैरे, सरचिटणीस, तालुका शाखा,राजुरा,आद. पौर्णिमा ब्राम्हणेताई हे होते. तर सर्वांनी शिबीरास मार्गदर्शन केले.संचालन आद.मेघाताई बोरकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन आयु नी वंदना देवगडे यांनी केले.तर प्रारंभी प्रशिक्षणार्थी बहुसंख्य महिलांनी आपले दहा दिवसामध्ये जे शिकायला मिळाले त्याबद्दल मनोगत व्यक्त केले.शिबीरामध्ये दहा दिवसात सर्वच विषयांवर आद.समताताई लभाने के.शी. यांनी उत्तम तर्हेने शिकविल्याबद्दलची पावती दिली,त्याबद्दल सर्वांनी समताताईचे अभिनंदन केले.भारतीय बौद्ध महासभा च्या वतीने सर्वच प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्र आणि संस्थेचे बौद्ध जीवन संस्कार पाठ सुत्तपठन चे पुस्तक देऊन गोैरविण्यात आले. शिबिराला दहा दिवस प्रशिक्षण देणाऱ्या आयु.नि.समता लभाने केंद्रीय शिक्षिका याच यांचा महिलां उपाशीकानी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.शेवटी सरणत्य घेऊन कार्यक्रम संपन्न झाला. शेवटी सर्वा करीता सुंदर जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली होती.सोमनाथपुर वार्ड येथील सदर कार्यक्रम अविस्मरणीय झाला.कार्यक्रमाचे नियोजन आणि प्रसंगी पाहुण्यांचा झालेला आदर सत्काराचे स्वरूप पाहुन पाहुण्यांचे मन भारावून गेले.इतरांना बोध घेण्यासारखा प्रसंग होता.राजुरा तालुका शाखेचे अध्यक्ष आद.धर्मुजी नगराळे,सरचिटणीस, आद.गोैतम चोैरे ,कोषाध्यक्ष,आद.देवगडे,तसेच सर्वच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या महिलांचे व पुरुषांचे चंद्रपूर जिल्हा,तालुका व शहर शाखेतर्फे हार्दिक अभिनंदन,धन्यवाद आणि सहर्ष आभार.असेच भारतीय बौद्ध महासभा च्या कार्यास सहकार्य करावे आणि बोधिसत्व डॉ बाबासाहेब यांनी दिलेला विज्ञान वादी बौद्ध धम्म घरा घरात पोहचवावा हीच मंगलकामना.