पैशाच्या मागणीतून पती पत्नीत वाद
पत्नीकडून पतीची हत्या, बल्लारपूर येथील घटना
✍सौ .हनिशा दुधे✍
बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
97642 68694
बल्लारपूर :- पत्नीने घर कामासाठी बचत गटातून १० हजाराचे लोन घेतले. याची माहिती पतीला मिळाली. त्यामूळे ते पैसे मिळविण्यासाठी पती सतत घरात वाद घालत होता. मंगळवार दि.३० ला पहाटे झालेला हा वाद हाणामारीत रूपांतर झाले. यामध्ये पत्नी रुकसाना व नातलगांनी मंजूर खान बशीर खान पठाण वय – ४८ याला मारहाण केल्यामुळे गंभीर जखमी झाला झाल्याने शासकीय रुग्णालय नागपूर येथे उपचार सुरू असताना काल रात्री ८ वाजताच्या सुमारास मंजूर खान बशीर खान पठाण याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी चार आरोपींना हत्येच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहेत.
रूकसाना मंजूर खान पठाण वय – ३८ वर्ष रा. साईबाबा वार्ड येथील राहणार आहे. काही आवश्यक कामासाठी पैश्याची गरज रुकसना हिने बचत गटातून १० हजाराचे लोन घेतले. रूकसाना लोन’ची रक्कम मंगळवार दि. २८ रोजी मिळाली. हि रक्कम आपल्या पत्नीला मिळाल्याची माहिती मृतक मंजूर खान बशीर खान पठाण याला मिळाली. ती रक्कम मागण्यासाठी त्याने पत्नीशी वाद घातला. शुल्लक हतापाई सुद्धा केली. परत दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता पैश्यासाठी मंजूर याने वाद घातला. वादाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाले. या हाणामारीत रुकसाना मंजूर खान पठाण वय – ३८ रा. साईबाबा वार्ड, बल्लारपूर, (रुकसाना हिची बहीण) रेहाना जाखीर हुसेन वय – ४० वर्ष, रा. शिवाजी वार्ड बल्लारपूर, ( रेहानाचा मुलगा ) जुबेर झाकीर हुसेन वय – २२ वर्ष, रा. शिवाजी वार्ड, बल्लारपूर, आणि ( रेहानाचा जावई ) मोहम्मद समीर मोहम्मद ताहीर वय – २२, रा. कोदनापूर, ता.खामगाव, जिल्हा- बुलढाणा असे चार आरोपी असून, या चौघांनी मंजूर खान बशीर खान पठाण वय – ४८ याला लाठ्या, काट्याने जबर मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी असता उपचारांसाठी नागपूर शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुःखपत जास्त असल्यामुळे बुधवार’ला रात्री ८ च्या सुमारास मृत्यू झाला आहे. घटनेती चारही आरोपींना हत्येच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे करीत आहेत.