महाराष्ट्रात घर खरेदी करणे का आणि किती महागणार?

56

सर्व सामान्यांचे घर घेण्याचे स्वप्न १ एप्रिल पासून सुरु झालेल्या नवीन आर्थिक वर्षांमध्ये महागणार,कोणत्या शहरांमध्ये घर खरेदी करणे महागले?

महाराष्ट्रात घर खरेदी करणे का आणि किती महागणार?

सिद्धांत
१ एप्रिल,मुंबई: राज्यातील छोट्या-मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या सर्वांचेच स्वतःच्या मालकीचे घर घेण्याचे स्वप्न असते. परंतु सर्व सामान्यांचे घर घेण्याचे स्वप्न १ एप्रिल पासून सुरु झालेल्या नवीन आर्थिक वर्षांमध्ये महागणार आहे.

कोरोना काळात रखडलेले प्रोजेक्ट, बंद कारखाने, पुरवठा साखळीमधील अडथळे यांमुळे बांधकामासाठी लागणारे कच्या मालाच्या वाढलेल्या किंमतीमुळे घरांच्या किमंती वाढलेल्या आहेतच. त्यातच कोरोनाकाळात आर्थिक परिस्थिती कोलमडल्याने नागरिकांना नवीन घर घेताना आर्थिक अडचणी उभ्या राहणार आहेत.

महाराष्ट्र राज्यातील ज्या शहरांमध्ये मेट्रो संबधीकाम सुरु आहेत अश्या शहरांमधील घरांच्या स्टॅम्प ड्युटीवर १ एप्रिल २०२२ पासून १ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. हा कर मेट्रो सेस नावाने सुरु करण्यात आला आहे. यांमुळे या कराचा अतिरिक्त भार घर खरेदी करताना नागरिकांना सोसावा लागणार आहे.

कोणत्या शहरांमध्ये घर खरेदी करणे महागले?
राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाने वार्षिक मूल्यदरात सरासरी पाच टक्क्यांनी वाढ केली आहे. हि दरवाढ १ एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे. यांमुळे या ठिकाणी सर्वसामान्यांचे घर घेण्याचे स्वप्न महागणार आहे. राज्यातील विविध शहरांचा विचार करता पुणे जिह्यात ८.१५ टक्के इतकाही दरवाढ करण्यात आली आहे. त्यानंतर औरंगाबाद महानगर पालिकेत १२.३८ टक्के, पिंपरी-चिंचवडमध्ये १२.३६ टक्के, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १२.१५ टक्के वाढ करण्यात आली आहे.

मुंबई उपनगरांमध्ये घरे किती महागली?
मुंबई शहर आणि उपनगरांसाठी विशेष दर जाहीर करण्यात आले आहेत. याअंतर्गत मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील घरांसाठी ०.८४ टक्के तर मुंबई उपनगरात ३.८३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

या ट्रेंडिंग बातम्या आपण वाचलात का?

https://www.instagram.com/p/CbwvRUNOCjJ/