किल्ले रायगडावरील शिवसमाधीची विटंबना करणाऱ्या दोषींवर कारवाई कधी-संभाजी ब्रिगेडची मागणी

किल्ले रायगडावरील शिवसमाधीची विटंबना करणाऱ्या दोषींवर कारवाई कधी-संभाजी ब्रिगेडची मागणी

किल्ले रायगडावरील शिवसमाधीची विटंबना करणाऱ्या दोषींवर कारवाई कधी-संभाजी ब्रिगेडची मागणी

किशोर किर्वे
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९

रायगड : – दि.८ डिसेंबर २०२१ रोजी किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची विटंबना करणाऱ्या चार आरोपींना अटक करण्यात आली होती अटक करतेवेळी पोलीसांना आरोपींकडे हाडे मिश्रीत राख सद्रुष्य भुकटी आढळली होती सदर भुकटी फाॅरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आली होती अटक करण्यात आलेले आरोपी जामिनावर खुलेआम फिरत आहेत तपासणीसाठी पाठविलेल्या भुकटीचा फाॅरेन्सिक अहवाल पोलीसांना प्राप्त झाला असून अद्याप पोलीस प्रशासनाकडून त्यासंबंधी कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.
महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची विटंबना हा अत्यंत गंभीर विषय असून पोलीस प्रशासन त्याकडे गांभीर्याने पाहत नाही अशी शिवप्रेमींची भावना आहे सदरहू महाराष्टातील शिवप्रेमी संघटना मराठा क्रांती मोर्चा आणि शिवप्रेमींच्या वतीने महाड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करून त्याद्वारे काही मागण्या करण्यात आल्या.
१) शिवसमाधी विटंबना प्रकरणातील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
२) पोलीसांना प्राप्त झालेला फाॅरेन्सिक अहवाल सर्व जनतेसमोर खुला करावा.
३) शिवसमाधीच्या विटंबना प्रकरणात सामील असणारे दोषी या कटामागील सुत्रधार यांचा शोध घेऊन त्यांना त्वरित अटक करावी.