नांदेड  येथील गुंठेवारीस महिन्याची मुदतवाढ

नांदेड  येथील गुंठेवारीस महिन्याची मुदतवाढ

नांदेड  येथील गुंठेवारीस महिन्याची मुदतवाढ

बालाजी पाटील
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
9420413391
9421808760

नांदेड : नांदेड वाघाळा महापालिकेत गुरुवारी (ता. ३१) स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. या सभेत एकूण तीन विषय ठेवण्यात आले होते. त्यावर चर्चा करुन ते सर्वानुमते पारित करण्यात आले. स्थायी समितीची सभा संपल्यानंतर ता. नऊ मार्चला सर्वानुमते तहकुब करण्यात आलेली स्थायी समितीची अर्थसंकल्पीय सभा घेण्यात आली.

या बैठकीला अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम, उपआयुक्त पंजाबराव खानसोळे, मुख्य लेखा परिक्षक टी. एल. भिसे, मुख्य लेखाधिकारी अश्विनी नराजे, लेखाधिकारी शोभा मुंडे, प्रभारी नगरसचीव अजितपालसिंघ संधू, कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, समिती सदस्य विरेंद्रसिंघ गाडीवाले, अब्दुल हफीज, राजु काळे, बालाजी जाधव आदी उपस्थित होते.

सभापती स्वामी यांनी बैठकीत गुंठेवारी योजना गुरुवारी ता. ३१ मार्चपर्यंत संपत होती. या योजनेस एक महिन्याची मुदतवाढ देण्यात येत असल्याचे सांगितले. अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी तसेच महसुल वाढविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. पुढील वर्षासाठी २०२२-२०२३ वर्षासाठी वसुलीसाठी योग्य नियोजन लावण्याच्या सूचना केल्या. यापुर्वीच्या आढावा बैठकीत क्षेत्रीय अधिका-यांना शहरात वाहतुक कोंडी होत असल्याने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने आपल्या क्षेत्रीय कार्यालयातील पार्किंगसाठी जागा उपल्बध असल्याची लवकर माहिती द्यावी, असेही सभापती यांनी बैठकीत सांगितले.