नांदगाव येथे ग्रामपंचायत सदस्यांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण
✒करण विटाळे✒
हिंगणघाट तालुका ग्रामीण
प्रतिनिधी: 8806839078
हिंगणघाट : -महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग अंतर्गत पंचायत राज प्रशिक्षण केंद्र नागपूर आणि ग्रामपंचायत नांदगाव यांचे संयुक्त विद्यमाने दि. २५ मार्च ते २७ मार्च तिन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य यांना प्रशिक्षण देण्यात आले. मुंबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८-५९ अंतर्गत कलम ४५ अंतर्गत सदस्यांचे अधिकार , कर्तव्य व जबाबदारी ,कृषी, लघु सिंचन, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, सामाजिक वनीकरण, लघु व कुटिरोद्योग, पिण्याचे पाणी व्यवस्थापन, प्राथमिक शिक्षण आरोग्य, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, माहिती तंत्रज्ञान, अपारंपरिक उर्जा दळणवळण, या ग्रामसुचितील १४ ठळक विभागाची माहिती पंचायत राज प्रशिक्षण केंद्राच्या सौ. सविता झाडे यांनी दिली. तसेच नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापन पाण्याचे ताळेबंद, गावाची पाण्याची प्रत्यक्ष गरज अस्तित्वात असलेल्या पाण्याचा स्त्रोतांची सांगड घालणे, आरोग्य ,पोषण व स्वच्छता यावर विशेष भर देण्यात यावा याबद्दल पंचायत राज प्रशिक्षण केंद्र नागपूर येथील अभ्यासक तज्ञ अशोक सुर्यवंशी यांनी दि्व्तीय सत्रात मार्गदर्शन केले.
महिला बचत गटाचा देशाच्या आर्थिक विकासात मोलाचा वाटा असून सरपंच महिलांनी पुढाकार घेऊन लघुउद्योग निर्मिती करुन आर्थिक विकास घडवून आणावा असे आवाहन नांदगाव चे सरपंच सतीश ठाकरे यांनी केले. ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. तीन दिवसीय शिबिरामध्ये कानगाव सर्कल मधील कापसी येथील सरपंच सौ. सुनीता रागिनवार, सौ. शुभांगी काकडे सरपंच ( चाणकि), सौ. सविता भोयर सरपंच (गाडेगाव) , मंदाताई धोबे सरपंच ( मोझरी), जोतिताई धोटे सरपंच खानगाव, दुर्गाताई तळवेकर सरपंच (वरुड) , सुनिता आगलावे सरपंच कोसुर्ला,ग्रामपंचायत सदस्य संदीप घोडे, सिंधू येवतकर, अल्का भेले, इत्यादी उपस्थित होते.