धनश्री महिला नागरी पतसंस्था मर्यादित हिंगणघाट संस्थेच्या अध्यक्षपदी सौ. कमाताई ठक यांची तर उपाध्यक्षपदी सौ. चंदाताई पोफळे यांची निवड.

✒करण विटाळे✒
हिंगणघाट तालुका ग्रामीण
प्रतिनिधी: 8806839078

हिंगणघाट: येथील धनश्री महिला सहकारी पतसंस्था मर्यादित हिंगणघाट, रजि, नं ८८०, ता. हिंगणघाट जि. वर्धा या संस्थेच्या सन-२०२१-२२ ते २०२६-२७ या कालावधीची निवडणूक प्रक्रिया पार पडली. संचालक मंडळाची प्रथम सभा दि. १०) ०३/२०२२ रोजी संस्थेच्या कार्यालयात कु. एन. एस. माळी, सहायक सहकार अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला सौ. कमा ग. ठक, सौ.चंदा खु. पोफळे, सौ. लता पा.तेजने, सौ. सुनीता ना. नवघरे, सो. वर्षा बा. वासेकर, सौ. प्रभा ना. सातारकर, सौ. गिता गो. मांडवकर,सौ.रजनी स. साळवे, श्रीमती. माया गु. सालवटकर, सौ. छाया ई. पोफळे, सौ हर्षा वि. पुनवटकर, आदि सर्व नवनीवर्चीत संस्थेच्या संचालक उपस्थित होत्या. या सभेत संस्थेच्या अध्यक्षपदी सौ. कमाताई ठक यांची तर उपाध्यक्षपदी सौ. चंदाताई पोफळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी संस्थेचे कर्मचारी सौ. रेखा अवजेकर, व व्यवस्थापक सौ. माधुरी घोडे तसेच संस्थेच्या सर्व सभासदांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे संस्थेच्या वतीने सर्व संचालकांनी अभिनंदन केले व सभेची सांगता केली.