कविता: कोण होते बाबासाहेब

78

आत्मचिंतन करा आणि सांभाळा स्वतःला आता ही वेळ गेली नाही..
कसे आलो या जगात आणि कसे गेलो हे तुम्हाला कळणार का कधी

अनुप कुंभारे
आदर्श नगर, हिंगणघाट
७७४१८५८९३२

कोण होते बाबासाहेब

ते होते धगधगते ज्वालामुखी
शून्यातून वर काढून केले आम्हा सुखी,
पण काय करत आहोत आम्ही
कसे जगत आहात तुम्ही
व्यसनाच्या विळख्यात अडकुनी
करत आहात स्वतःला आणि समाजाला दुखी..

बुद्ध आणि बाबासाहेबांचे विचारांना आत्मसात करायचे सोडून ,
आणत आहात एकमेकांचे पाय खेचण्यासाठी शब्द तुमच्या मुखी..

रात्र वैऱ्याची आहे हे तुम्हाला कळले असेल तर..
पाहा जरा आजू बाजूला समाजातले किती लोक आहेत दुखी..
बुद्धाचा करुणेचा मार्ग अवलंबा आणि त्यांना मदत करा
तेव्हाच तुमचं आयुष्य होईल सार्थक आणि सुखी..

त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार सोडून
जयंती साजरी करण्याचा नावाखाली आणत राहाल दारू खर्ऱ्याचा वास आणि खराब शब्द मुखी..
तर बाबासाहेब कधी देतील का तुम्हाला माफी..

बाबासाहेब म्हणाले होते माझा वाढदिवस साजरा करू नका,
जो समाज एखाद्या व्यक्तीचा देवप्रमाने उदाे उदो करतो तो समाज नशेच्या मार्गावर आहे असे मी समजतो,
नाहि कराल तुम्ही त्यांनी जसे सांगितले तसे
तर होईल का तुमचे जीवन कधी सुखी

आत्मचिंतन करा आणि सांभाळा स्वतःला आता ही वेळ गेली नाही..
कसे आलो या जगात आणि कसे गेलो हे तुम्हाला कळणार का कधी
नाही तर स्वतःच तुम्ही स्वतःला कधी देऊ शकणार नाही माफी ..