यवतमाळ पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या, पोलिस मुख्यालयात होती नेमणूक

53

यवतमाळ पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या, पोलिस मुख्यालयात होती नेमणूक

भुषण कावळे  यवतमाळ

यवतमाळ :- येथील पोलिस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने क्वॉटरमध्ये आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास उघडकीस आली.

किशोर फकरूजी मोरे वय 35, रा. पळसवाडी पोलिस क्वॉर्टर, यवतमाळ, असे मृताचे नाव आहे. हा कर्मचारी पोलिस मुख्यालयात नेमणुकीस होता. शनिवारी घरातून दुर्गंधी येत असल्याने ही घटना उघडकीस आली. यवतमाळ शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिवाळीच्या दिवशी पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.