आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या हस्ते एन.एस.एस. शिबिराचे उद्घाटन मौजा पालडोंगरी येथे ‘ स्वच्छ ग्राम, निरोगी ग्राम सात दिवशीय आझादी का अमृत महोत्सव सुरू

आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या हस्ते एन.एस.एस. शिबिराचे उद्घाटन

मौजा पालडोंगरी येथे ‘ स्वच्छ ग्राम, निरोगी ग्राम

सात दिवशीय आझादी का अमृत महोत्सव सुरू

आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या हस्ते एन.एस.एस. शिबिराचे उद्घाटन मौजा पालडोंगरी येथे ' स्वच्छ ग्राम, निरोगी ग्राम सात दिवशीय आझादी का अमृत महोत्सव सुरू
✍ भवन लिल्हारे ✍
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8308726855,8799840838

मोहाडी :- भंडारा जिल्हा, मोहाडी तालुक्यातील मौजा पालडोंगरी येथे सात दिवशीय आझादी का अमृत महोत्सवानिमित्त ‘स्वच्छ ग्राम, निरोगी ग्राम’ या संकल्पासह
एन. जे. पटेल महाविद्यालय, मोहाडी च्या राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिराचे उद्घाटन तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. राजुभाऊ कारेमोरे यांच्या हस्ते पार पडले. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत ‘स्वच्छ ग्राम, निरोगी ग्राम’ या संकल्पासह ग्राम पालडोंगरी येथे आयोजित सात दिवसीय निवासी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलतांना कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग व रोजगार यावर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ग्राम विकासात राष्ट्रीय सेवा योजनेचे योगदान व सुप्त कला गुणांना प्रकट करण्याचे आवाहन त्यांनी शिबिरार्थी विद्यार्थ्यांना केले. त्या आधी एन.एस.एस. ध्वजाचे ध्वजारोहण मा. आमदारांच्या हस्ते करून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वंदनीय गाडगे बाबा यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
ज्यांच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन गावात होत आहे अशा सरपंच सौ. सुरेखाताई प्रकाशजी खराबे यांनी अध्यक्षीय स्थानावरून विकासाची प्रक्रिया निरंतर असली पाहिजे असे सांगून गावकर्यांुना शिबीराच्या विविध उपक्रमांना उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले.
महविद्यालयाच्या प्राचार्य तथा शिबीर संयोजक डॉ. एस. एस. चव्हाण मॅडम यांच्या मार्गदर्शनात शिबीर प्रमुख तथा कार्यक्रम अधिकारी प्रा. महेशकुमार भैसारे यांनी आपल्या प्रास्ताविकातून एन.एस.एस. चा इतिहास, उद्दिष्टे, शिबिरातील विविध उपक्रम यांविषयी गावकर्यांॉना अवगत करून बौद्धिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी किरणजी अतकरी, नरेशजी नलगोपुलवर, प्रभाकरजी डहारे, सौ. सुनिता वरकडे, शरदजी मोहतुरे, सौ. मंगला नामूर्ते, सुधाकरजी डहारे, मारोतीजी सयाम, धामाजी समरीत, राधेश्यामजी खंडाते आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते. या समारोह प्रसंगी ग्राम पंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिति सदस्य, गावातील इतर मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारोहाच्या यशस्वीते साठी सरपंच मॅडम, श्री प्रकाशजी खराबे, प्रा. डॉ. डाकरे मॅडम, डॉ. पवार सर, डॉ. वरकडे सर, प्रा. जाधव सर, संजय डहाके, सर्व स्वयंसेवक यांचे सहकार्य लाभले.