लाचखोर महसूल कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी
उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांना पत्रकार शिष्टमंडळाचे निवेदन
क्रिष्णा वैद्य
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी /विशेष
9545462500
ब्रम्हपुरी :- १२ मार्च २०२२ ला तालुक्यातील तोरगाव गावा जवळ रात्रौ ११ वाजताच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन वाहणांवर शासकीय नियमावली नुसार कुठलीही कारवाई न करता तालुक्यातील ३ तलाठी कर्मचाऱ्यांनी ९६ हजार रुपयाचे परस्पर आर्थिक व्यवहार करीत आपसी समझोत्याने पाहार्णी येथील दोन तर तोरगाव येथील एक वाहन सोडून दिल्याची लेखी तक्रार स्थानिक प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पत्रकारांना देतं, लाचखोर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही व्हावी व तस्करीला लगाम यावा अशी विनंती केली होती. तर याबाबत स्थानिक वृत्तपत्रांमधून बातम्या ही प्रकाशित झाल्यात मात्र सदर कर्मचाऱ्यांवर कुठली ही कार्यवाही झाली नाही.
तसेच कुर्झा हनुमान मंदिर जवळ २७ मार्च ला रात्रौ ११ वाजताचे दरम्यान रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाच्या उर्मट वागणुकीने शुन्य रॉयल्टी असलेला वाहन स्थानिक नागरिकांनी पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे लावला असता, उलट या नागरिकांनाच अपमानास्पद वागणूक देउन रात्रौ १२ वाजताच्या नंतर वेळवर आणलेली रॉयल्टी ग्राह्य धरत वाहन सोडून देण्यात आले.
अवैध वाळू तस्करी करीत महसूल बुडवणाऱ्या वाहण धारकासह परस्पर आर्थिक व्यवहार करीत लाचखोरी केल्याने सदर प्रकरणामुळे तालुक्याच्या प्रतिमेला महसूल प्रशासनाच्या लाचखोरीने धक्का लागला असून तालुक्याची सर्वत्र बदनामी होत आहे. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी तक्रार ब्रम्हपुरी तालुक्यातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी यांना तक्रार, निवेदन देऊन केली असून प्रशासन लाचखोरांची पाठराखण करणार अथवा कायदेशीर कारवाई करणार हे पाहणे आता तालुक्यातील नागरिकांसाठी औचित्याचे ठरणार आहे.