तरंगिनी रास-गरबा गृप च्या वतीने शाळेला क्रीडा साहित्य भेट
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभिड–सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या तरंगिनी रास- गरबा गृप नाग भिड च्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा क्रीडात्मक विकास होण्याच्या दृष्टीने आज जि.प. प्राथमिक शाळा भिकेश्वर येथील शाळेत क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले..गेल्या दोन वर्षांपासून शाळा कोरोना मुळे बंद होत्या आणि विद्यार्थी हा मोबाइल कडे जास्त आकर्षित झालेला होता त्या विद्यार्थ्याला मोबाइल मधील विविध गेम पासून दूर नेण्यासाठी विविध खेळाचे साहित्य देण्यात आले यात बँट- बाँल,शतरंज, कँरम,बॅडमिंटन,लुडो, यासारख्या विविध खेळाचे साहित्य देण्यात आले.. यावेळी गृप च्या संचालिका प्रिया लांबट,संचालक वैभव पिसे, गणेश नागापुरे, पराग भानारकर यांची उपस्थिती होती.
या उपक्रमाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका माया सहारे मॅडम,सहायक शिक्षिका धामणगे मॅडम, व सर्व विद्यार्थी यांनी सर्व गृप चे आभार मानले.