ठाणे शहरातील ज्युपिटर हॉस्पिटलच्या तिन डॉक्टर व नर्स वर गुन्हा दाखल
✍ सुहास पाटील✍
ठाणे शहर प्रतिनिध
मीडिया वार्ता न्यूज।
9321388971
ठाणे :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहेत की ठाण्यातील एक प्रसिद्ध नामांकित पण महागड हॉस्पिटल म्हणून ज्युपिटर हॉस्पिटलचे नाव आहे,ज्यांची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी आहे, किंवा ज्यांचा मेडिक्लेम भला मोठा आहे असे लोक इथे ट्रीटमेंट साठी येतात,भली मोठी इमारत आणि सगळ्या अध्ययावत मशनरीने सुसज्ज असलेल्या हॉस्पिटल मध्ये आपल्याला ट्रीटमेंट नक्कीच चांगली मिळणार या भावनेने इथे पेशन्ट ऍडमिट होतात,अशा या हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन करताना महिलेच्या पोटात कापडाचा बोळा राहतो या सारखी निष्काळजी पणाची गोष्ट नाही,
व्हिव्ही्याना मॉलच्या बाजूला असलेल्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये वृंदावन सोसायटी येथे राहणाऱ्या मृण्मयी अजिंक्य दिवेकर या 6/5/2020 रोजी बाळंतपणासाठी ऍडमिट झाल्या होत्या, त्या नंतर 7/5/2020 ला त्यांचे डॉ. आशुतोष आजगावकर यांनी ऑपरेशन केले , सिजेरिअन करते वेळी योग्य ती काळजी दक्षता न घेता, ऑपरेशन करते वेळी वापरण्यात येणारा कापडाचा बोळा ( फॉरेन बॉडी ) निष्काळजी पणे तसाच ठेवून त्यांनी ऑपरेशन पूर्ण केले, त्या मुळे मृण्मयी दिवेकर यांच्या पोटात असह्य वेदना होऊ लागल्या,विशेष म्हणजे मृण्मयी दिवेकर या स्वतःहा डॉक्टर आहेत या वेदनेची कल्पना त्यांनी डॉ. आजगावकर यांच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिली,पण त्यांनी जवळ जवळ या गोष्टी कडे दुर्लक्षच केले, त्या मुळे मृण्मयी यांच्या आतड्याला व अंडाशयाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली, ही गोष्ट त्यांच्या जीवावर बेतली असती,
त्या नंतर सातारा येथील हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाल्या व तेथील डॉक्टरांनी सिटीस्क्यान करून नंतर ऑपेरेशन करून कापडाचा बोळा काडून टाकला, त्या मुळे त्यांच्या उजव्या बाजूची अंडाशयाची नळी काडून टाकण्यात आली,या झाल्या प्रकारा बद्दल त्यांनी वर्तक नगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली, त्या प्रमाणे 28/3/2022 रोजी डॉ.अशुतोष आजगावकर,डॉ सुप्रिया महाजन,डॉ. चिन्मयी गडकरी,व ऑपरेशन थीएटर नर्स यांच्या वर 308, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.मृण्मयी अजिंक्य देवकर यांनी मीडिया वार्ता न्यूज। सांगितले