मौजा डोडमाझरी ( टेकेपार ) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जुनाट जीर्नावस्थेत असलेला पुतळा उभारण्यास मनाई

मौजा डोडमाझरी ( टेकेपार ) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जुनाट जीर्नावस्थेत असलेला पुतळा उभारण्यास मनाई

जातीवादी लोकांनी कामात आणले अडथळा

पोलीस चौकी लाऊन काम केले बंद.

बुद्धीष्ट लोकांना बोरींगचा पाणी भरण्यास मनाई, किराणा दुकानातून व पानटपरी तून कोणतेही सामान न घेण्याचे निर्णय

कुठे आहेत बुद्धीष्ट वादी नेते, जागृत होण्याचे आव्हान.

मौजा डोडमाझरी ( टेकेपार ) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जुनाट जीर्नावस्थेत असलेला पुतळा उभारण्यास मनाई
✍ भवन लिल्हारे ✍
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8308726855,8799840838

भंडारा :- महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्हा येथे दि.27 मार्च 2022 रोजी मौजा डोडमाझरी
( टेकेपार ) येथील घडलेली घटना आहे. डोडमाझरी येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा फार जुना असल्याने जीर्नावस्थेत आहे.त्यामुळे गावातील बौध्द बांधवांनी जीर्न अवस्थेत असलेल्या डाॅ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे विसर्जन करून त्या ठिकाणी नविन पुतळा उभारण्याचे ठरविले आणि त्यासाठी कामाला लागले.

लोकांनी कामाला सुरूवात केली असता तेथील जातीवादी लोकांनी कामात अडथळा आणून काम रोकले. गावात बौध्द लोकांची जनसंख्या कमी असल्याने त्या गावातील इतर समाज एक झाला आणि होत असलेले काम रोकण्यात आले.यामध्ये सर्व गोंड गोवारी,ढीवर,गवळी,तेली,माळी,कुणबी आणि इतर लोक एका बाजूला आणि आंबेडकरी जनता एका बाजूला.

हा प्रकार बाजूला लागून असलेल्या टेकेपार येथील आंबेडकरी लोकांच्या लक्षात आला .त्यामुळे टेकेपार येथील लोकांनी सर्व कामाला सुटी ठेवून काम करण्याचे ठरविले.दुस-या दिवसी म्हणजे दि.28/3/2022 ला सर्व डोडमाझरी-टेकेपार येथील आंबेडकरी लोकांनी काही प्रमाणात काम केले,परंतु त्यांचे असलेले नेते यांच्या हस्तक्षेपा मुळे पोलीस चौकी लावून काम बंद करण्यात आले.गावातील वातावरण फार दुषीत झाले आहे. डोडमाझरी येथील obc लोकांनी त्यांच्या मोहल्यात असलेल्या बोरींग मधून पाणी भरण्यास मज्जाव केलेला आहे आणि बुध्दीष्ट लोकांच्या किराणा दुकानातून व पानटपरीतून कोणतेही सामान न घेण्याचे ठरविले आहे.

मुद्दाम एक सांगावयाचे म्हणजे आरक्षणाच्या भरवस्यावर निवडून आलेल्या पुढा-यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात येवू नये,या साठी प्रयत्न करीत आहे,ही किती लाजरवाणी गोष्ट आहे.

एवढे प्रकरण होवून ही स्वतःला आंबेडकरी पक्षाचा समजणारा नेता अजून या गावी आला नाही. त्यामुळे गावातील लोकां मध्ये भीतीचे वातावरण आहे.

त्यामुळे आता तरी सर्व आंबेडकरी नेत्यांनी पक्ष बाजूला ठेवून सर्वांनी एक होवून, बाबासाहेबांचा लेकरू समजून डोडमाझरी टेकेपार येथील लोकांना साथ देवून बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यास मदत करावी,अशी येथील आंबेडकरी जनतेची विनंती आहे. जागे व्हा, संघटित व्हा, संविधान बनविणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा का उभारू देत नाही. अशा प्रश्न पडला असुन या अन्यायाविरुद्ध विरोधात लढा द्या अशी अपील जयभीम लोकांना केली आहे.