बीपीएलमध्ये बसले धनाढ्य, खरे बीपीएल राशनापासून वंचित ; किशोर बावणे यांनी केली फेरचौकशीची मागणी

बीपीएलमध्ये बसले धनाढ्य, खरे बीपीएल राशनापासून वंचित ; किशोर बावणे यांनी केली फेरचौकशीची मागणी

बीपीएलमध्ये बसले धनाढ्य, खरे बीपीएल राशनापासून वंचित ; किशोर बावणे यांनी केली फेरचौकशीची मागणी

• आशिष चेडगे • 
साकोली तालुका प्रतिनिधी 
8605699863 

साकोली : शहरातील कितीतरी धनाढ्य लोक की जे आज बीपीएल यादीत आहेत. त्यांना का बर समाविष्ठ करीत खरे बीपीएल राशनकार्डधारक लाभार्थ्यांना वंचित ठेवले. वरून दररोज शासनाकडून क्विंटलच्या वर राशन उचलून दूकानात सर्रास विकण्याचा संतापजनक प्रकारावर आळा घालण्याची मागणी फ्रिडम युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर बावणे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे केली व धनाढ्यांचे नाव काढून खरे गोरगरीबांना बीपीएलमध्ये समाविष्ठ करण्याचीही मागणी केली आहे.
गोरगरीबांच्या बीपीएल यादीत आज साकोलीत ७०℅ असे धनवान लोक आहेत की ते आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. अश्यांनी राशनचा गैरफायदा उचलून मोठ्या दूकानदारांना राशन विकण्याचा सपाटा लावला, व गोरगरीबांना त्या यादीतून वंचित ठेवित अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या नियमांचे धिंडवडे काढले. आज शहरात दररोज हजारो किलो शासकीय राशन बड्या दूकानदारांना विकले जाते, राशन लागत नाही तर बीपीएल मध्ये नाव का ठेवता.? या संतापजनक प्रकाराने खरा गरीब व बीपीएलपासून वंचित गरीब लाभार्थ्यांसोबत असा अवहेलना प्रकार का.? अन्न व नागरी पुरवठा विभागाने येथील सर्व बीपीएल यादीतील ते लाभार्थी खरच बीपीएल आहेत का याची यादी फेरतपासात घेऊन त्याची चौकशी करावी. व राशन विकणा-या धनाढ्यांची नावे रद्द करून अश्या गोरगरीब व ख-या बीपीएलधारक यांची नावे समाविष्ठ करून शासनाला चूना लावण्याच्या या संतापजनक प्रकारावर आळा घालण्याची आणि ज्यांना अनेक वर्षापासून राशन बनूनही फायदा नाही अश्यांना खरा फायदा मिळावा अशी मागणी फ्रिडम युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर बावणे यांनी शासनाकडे केली आहे.