रा.सुं.बिडकर महाविद्यालयात माजी खेळाडू विद्यार्थ्यांचा सत्कार
✒करण विटाळे✒
हिंगणघाट तालुका ग्रामीण
प्रतिनिधी:8806839078
हिंगणघाट –रा.सु.बीडकर महाविद्यालयात माजी विद्यार्थी खेळाडूंकडून शिक्षण महर्षी स्वर्गीय कृष्णराव झोटिंग पाटील स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय हॉकी सामन्यांचे आयोजन दिनांक 31 मार्च 1 2 व 3 एप्रिल 2022 रोजी करण्यात आले होते.
या सामन्याच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या वतीने माजी खेळाडू विद्यार्थ्यांचा सत्कार दिनांक 03/04/2022 रोजी महाविद्यालयाच्या पटांगणावर सायंकाळी सहा वाजता करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय कृष्णरावजी झोटींग पाटील व मेजर ध्यानचंद हॉकी जादूगर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.जी.आंबटकर होते तर प्रमुख अतिथी प्रा.डॉ.बी एम राजूरकर उपप्राचार्य बिडकर महाविद्यालय तसेच अँड. श्री सुधीर बाबु कोठारी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट व राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल भाऊ वांदीले उपस्थित होते. या सर्वांनी मानवी जीवनात खेळाचे किती महत्त्व आहे याबद्दल विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. बलराज अवचट यांनी केले. मंचावर माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. चंद्रमोहन डाखोरे तर सचिव प्रा. गिरीधर काचोळे समन्वयक प्राध्यापक विनोद पुनवटकर सदस्य आशिष भोयर,चंद्रशेखर निमट तसेच आय.क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. शरद विहिरकर उपस्थित होते. महाविद्यालयाने माजी खेळाडूंचा सत्कार केला त्यात शेखर डोंगरे,नदीम रजा,शाहिद रजा, सुनील डोंगरे, विलास वैद्य, दीपक निरस्कर, प्रविन सेलकर, मोहम्मद शाहिद,हरीश त्रिवेदी, सुहास डोंगरे,मनीष धानुलकर, सोनू टेंभुर्णे, मुन्ना कुरेशी, शेख अन्वर, अतुल झाडे, श्रीकांत भगत, अतुल त्रिवेदी, सागर काळे, मयूर वैरागडे, अशकम बेग,मोहसिन शेख,विशाल कस्तुरे, मनीषा शेंडे,तेजस झोटींग,डिंकी बंडावार ज्योती कांबळे, वैशाली देशमुख, शुभांगी देशकर, पद्मा उमाटे, हेमलता दुरबुडे,शाहिद सय्यद, मोजेस सोनटक्के, मुजीब खान इत्यादी कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक डॉ. श्रीकृष्ण बोढे यांनी केले तर सर्वांचे आभार सुनील डोंगरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यात चंद्रशेखर कुटे,जगदीश ढाले तसेच आयोजन समितीतील सदस्य प्रा. डॉ. राजू निखाडे प्रा. डॉ. अनिल बाभळे तसेच सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.