अवैध व्यवसायाला आळा घाला अन्यथा तीव्र आंदोलन:वंचित मा तहसीलदार साहेब यांच्या वतीने मा जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांना निवेदन

अवैध व्यवसायाला आळा घाला अन्यथा तीव्र आंदोलन:वंचित

मा तहसीलदार साहेब यांच्या वतीने मा जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांना निवेदन

अवैध व्यवसायाला आळा घाला अन्यथा तीव्र आंदोलन:वंचित मा तहसीलदार साहेब यांच्या वतीने मा जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांना निवेदन

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी : गोंडपीपरी तालुक्यात अवैधरीत्या होत असलेले खनिज संपत्तीचे उत्खनन,दिवसा-ढवळ्या होत असलेल्या रेतीच्या भरमसाठ चोरीमुळे शासनाच्या महसुलाचे पर्यायाने जनतेचे अपरिमित नुकसान होत असल्यामुळे विकासाच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहचत नसुन शासनाचा विकास खुंटलेला आहे.

अवैध दारूविक्रीमुळे एकीकडे शासनाचा महसूल बुडून दुसरीकडे मात्र पोलीस विभाग गब्बर होत असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे तसेच युवा पिढी बर्बाद होत असून बहुजन समाजाच्या संसाराचे वाटोळे होत आहे अवैध दारूमुळे आरोग्यावर परिणाम होत असतांना पोलिस विभाग बघ्याची भूमिका घेत असून बहुजन समाजाला नेस्तनाबूत करण्याकडेच लागला की काय असे वाटायला लागले आहे त्यामुळे अवैध दारूविक्री मुळे समाजमनावर होणारा विपरीत परिणाम तात्काळ थांबविण्यात यावा.
एकीकडे कोविड-१९ मुळे तर दुसरीकडे बसेस च्या चालक-वाहक कर्मचाऱ्यांमुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी शासन खेळते की काय असे वाटायला लागले आहे. दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचा शिक्षणाशी प्रत्यक्ष संबध तर तुटलाच आहे परंतु ऑन लाईनच्या नावाने प्रत्येक विद्यार्थ्यांकडे नकळत्या वयात मोबाईल आल्यामुळे शिक्षणाच्या नावाखाली विचकदागोपणा विद्यार्थी करीत असल्याचे दिसून येत आहेत त्यामुळे तात्काळ विशेष बस सेवा सुरू करून ऑफ लाईन शिक्षणाची सोय करण्यात यावी आणि पुढील काळात बारावीनंतरच विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल देण्याची सोय करण्यात यावी आणि वाम मार्गाकडे जाणाऱ्या पिढीला वाचवावे.
केंद्र सरकारनी पेट्रोल, डिझेल,गॅस यांच्या किंमती अवाढव्य वाढविल्या मुळे आम जनतेची परिस्थिती श्रीलंकेसारखी होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे किंमती लवकर कमी करण्यात याव्यात.
धाबा-हिरवा-पोडसा या राज्य महामार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमीनी गेल्या आहेत त्यांना तात्काळ मोबदला देण्यात यावा.
या सर्व मागण्यांसंदर्भात २८ फेब्रुवारी २०२२ रोजी निवेदन देऊन सुध्दा त्याबाबत अजूनपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे परत एकदा निवेदनाद्वारे तालुका गोंडपीपरी वंचित बहूजन आघाडी च्या वतीने मा. तहसीलदार साहेब गोंडपीपरी यांच्या मार्फत मा.जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर, मा.उपविभागीय अधिकारी साहेब गोंडपीपरी यांना निवेदन देण्यात आले असून तात्काळ मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुरेश दुर्गे,तेजराज डोंगरे,प्रकाश तोहोगावकर,संदेश निमगडे,विजया दुर्योधन आदींनी दिला आहे.