दोन वर्षा नंतर दासगाव मधील श्री काल भैरव महाराजांचा यात्रोत्सव ११ एप्रिलला होणार साजरा

दोन वर्षा नंतर दासगाव मधील श्री काल भैरव महाराजांचा यात्रोत्सव ११ एप्रिलला होणार साजरा

दोन वर्षा नंतर दासगाव मधील श्री काल भैरव महाराजांचा यात्रोत्सव ११ एप्रिलला होणार साजरा

✍रेश्मा माने ✍

महाड शहर प्रतिनिधी
8600942580

महाड – महाड तालुक्यांतील दासगाव मध्ये असलेल्या श्री काल भैरव महाराजांचे जागृत देवस्थान असल्याने भाविकांची या देवस्थानावर अपार श्रध्दा आहे.येत्या ११ एप्रिल सोमवार रोजी श्री काल भैरव महाराजांचा यात्रोत्सव आयोजित करण्ंयात आला असुन देवस्थान कमेटी व भाविक उत्सवाच्या तयारीला लागले आहेंत.दासगाव पंचक्रोशीतील सर्वात मोठी यात्रा असल्यामुळे भाविकांच्या स्वागताची तयारी पुर्ण झाली असल्याची माहिती श्री कालभैरव देवस्थान ट्रस्टचे सचिव संतोष जाधव यांनी दिली.
करोना काळात सर्व उत्सवांना बंधी होती त्यामुळे दासगाव मधील दर वर्षी गुडीपाडव्या नंतर होणारा श्री काळ भैरव देवस्थानाचा यात्रोत्सव देखील साजरा करण्यात आला नाही . यंदा शासना कडून यात्रा भरविण्याची परवानगी देण्यांत आल्याने भाविकां मध्ये आंनदाचे वातावरण आहे, दासगावचे ग्रामदैवत असलेले श्री कालभैरव देवस्थानची यात्रा यावर्षी देखिल भव्य स्वरुपांमध्ये ११एप्रिल रोजी भरविण्यात येणार आहे.
कोकणांमध्ये चैत्र महिन्यांत गावा गावांमध्ये असलेल्या ग्राम दैवतांच्या यात्रा आयोजित करण्याची प्रथा असुन दासगाव येथील काळभैरव उत्सव चैत्र महिन्या मध्ये गुडी पाडवा झाल्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्ंयात येत असल्याची माहिती देण्यांत आली.सोमवार दि.११ एप्रिल रोजी संध्याकाळी चार वाजल्या नंतर यात्रेला खऱ्या अर्थाने सुरवात होते,या यात्रे मध्ये लाट फिरविण्याची प्रथा असुन संध्याकाळी आणि रात्री लाट फिरविण्याचा कार्यक्रम केला जातो.यात्रे मध्ये सव,वीर,वामने, गोठे या गावातुन देव देवतांच्या पालख्या सासन काठ्यसह वाजत गाजत सहभागी होतात.रात्री यात्रे निमित्त कार्यक्रमाचा आयोजन करण्यात येतो मात्र यावेळी शक्तीवाले तुरेवाले हा करमणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .११ एप्रिल रोजी होणाऱ्या दासगाव येथील श्री कालभैरव महाराजंचा यात्रा उत्सवाची तयारी पुर्ण झाली असुन भाविमकांना कोणत्याही स्वरुपाची गैर सोय होऊ नये या करीता देवस्थान कमेटी कडून सर्व व्यवस्था करण्ंयात आली असल्याचे उत्सव कमिटी अध्यक्ष रितेश पयेलकर यांनी सांगितले आहे.आणि या यात्रेची शोभा वाढवण्यासाठी मोठ्या संख्येने दुकानदारांनी या मध्ये सामील होण्याचे आवाहन उत्सव कमिटी कडून करण्यात आले आहे.