मा.बंटीभाऊ भांगडीया आमदार यांनी विलम वासीयांना उपलब्ध करून दिली स्वखर्चातून हातपंप..
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभीड -तालुक्यातील मौजा-विलम येथे अनेक दिवसांपासून पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे गावातील पाण्याची टंचाई बघता समस्या दूर व्हावी म्हणून विलम येथील ग्रामपंचायत ने अनेकवेळा निधीतून हातपंप खोदले परंतु त्या गावात पाण्याची पातळी कमी असल्याने हातपंप मारूनही पाण्याचा स्रोत न लागल्याने विलमवासीय जनता पिण्याच्या पाण्याची कमतरता दूर होत नसल्याने खूप त्रस्त झाली होती.
त्यामुळे काही दिवसांपूर्वी मा.बंटीभाऊ भांगडीया आमदार चिमुर विधानसभा क्षेत्र हे नागभीड तालुक्याच्या समस्यांचे निवारण व तालुक्याचा आढावा घेण्यानिमित्य विलम येथे गेले असता विलम वासीयांनी गावात होणारी पाण्याची टंचाई व गावात पाण्याचा स्रोत उपलब्ध होत नसल्याने हातपंप मारूनही पाणी लागत नसल्याचे मा.बंटीभाऊ भांगडीया आमदार साहेबांना सांगितले असता मा.आमदार साहेबांनी विलम येथे गावात पाण्याचा स्रोत नक्कीच उपलब्ध करून देणार असे आश्वासन दिले होते.
त्याच दिलेल्या शब्दाची जाणीव ठेवत चिमुर विधानसभा क्षेत्रात विकासपुरुष म्हणून ओळखले जाणारे गरिबांचे कैवारी मा.बंटीभाऊ भांगडीया आमदार साहेबांनी स्व-खर्चातून विलम येथे पाण्याच्या स्रोत उपलब्ध असलेल्या ठिकाणची माहिती घेऊन बोर खोदले व आनंदाची बातमी की भरपूर प्रमाणात पाणी सुद्धा लागले.गावात पहिल्यांदा एवढ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचे स्रोत उपलब्ध झाल्याने विलम वासीय नागरिक आनंदीत असून संपूर्ण विलम वासीय जनतेने मा.आमदार साहेबांनी स्व-खर्चाने हातपंप उपलब्ध करून दिले व गावातील पाण्याची समस्या दूर करून दिल्याबद्दल मा.आमदार साहेबांचे मनपुर्वक आभार मानले.