शेतकरी धडकले महावितरणवर ; १० तास विज द्या अन्यथा दिला साखळी उपोषणाचा इशारा
आशिष चेडगे
साकोली तालुका प्रतिनिधी
8605699863
साकोली : सातलवाडा महावितरण विज पुरवठा केंद्रांतर्गत विर्शी येथील ६० ते ७० शेतकरी (०७.एप्रिल) ला महावितरण साकोली मुख्य कार्यालयवर धडकले. यांनी कार्यकारी अभियंता, तहसिलदार साकोली, पोलीस ठाणे, आमदार नाना पटोले यांचे कार्यालय येथे निवेदन देत मागणी केली की कृषि पंपाचा दिवस व रात्रपाळीतील विज पुरवठा हा ८ ते १० करावा अन्यथा दोन दिवसात येथेच साखळी उपोषणाचा इशारा दिला आहे.
सातलवाडा विज पुरवठा विभागातील विर्शी येथे धान, उस, भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत गेल्या ८ दिवसांपासून महावितरण सबस्टेशन कडून कृषिपंपाना विज मिळत नसल्याने या उष्णतेने पिक वाळीत चालले बघून शेतकरी पार संतापले त्यांनी थेट कार्यकारी अभियंता महावितरण कार्यालयावरच ६० ते ७० शेतक-यांनी धडक दिली व मागणीवर ठाम अडून बसले की शासनाने निर्धारीत ठरविल्याप्रमाणे पूर्ण ८ ते १० तास क्षेत्रात अखंडीत विज पुरवठा द्यावा. आता मात्र दोन ते तीन तास शेतातील विज सुरू असून पिकांची नुकसानी झाल्यास महावितरणला जबाबदार धरण्यात येईल असा इशारा देत या दोन दिवसात विज आठ ते दहा तास न झाल्यास येथेच साखळी उपोषणाचा इशारा देत कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले. निवेदनात विर्शी व सातलवाडा येथील शेतकरी घनश्याम पारधी, दामोधर कापगते, प्रदिप बिसेन, लावण्य पटले, सुरेश कापगते, रेशीम सोनवाने, अंकीत लोधीकर, रविंद्र कापगते, सचिन कापगते, मनोहर कापगते, देवराव बाळबुद्धे, आनंद कुंभारे, रत्नाकर पारधी यांसह येथे जिल्हा परीषद सदस्या शितल राऊत यांसह हजर होते.