एन. जे. पटेल महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराचा समारोप
✍ भवन लिल्हारे ✍
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8308726855,8799840838
मोहाडी :- भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुका अंतर्गत मौजा पालडोंगरी येथील ७ दिवशीय आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत स्वच्छ ग्राम, निरोगी ग्राम ” या कार्यक्रमाचे समारोप करण्यात आले.
गोंदिया शिक्षण संस्थे द्वारा संचालित , एन. जे. पटेल महाविद्यालायच्या राष्ट्रीय योजना शिबिराचा समारोप सरपंच मा. सुरेखाताई प्रकाशजी खराबे यांच्या अध्यक्षतेखाली थाटात पार पडला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. चव्हाण यांच्या मार्गदर्शनात ग्राम पालडोंगरी येथे आयोजित सात दिवसीय विशेष निवासी शिबिराच्या समारोप प्रसंगी सरपंच खराबे मॅडम यांनी शिबिरार्थी स्वयंसेवकांचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रम अधिकारी महेशकुमार भैसारे, सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सुनिल चवळे, सहकार्यक्रम अधिकारी डॉ. गणेश वानखेडे यांच्या मार्गदर्शनात केलेले श्रमदन, पथनाट्य, पुतळ्यांची केलेली सफाई, प्रबोधन पर बौद्धिक व सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे प्रभावित होऊन पुन्हा शिबीर आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मंचावर उपसरपंच सुधाकरजी डहारे, शा.व्य.स. अध्यक्ष प्रभाकरजी डहारे, तं.मु.स. अध्यक्ष तुकडोजी पुडके, सौ. सुनीता वरकडे, मुख्याध्यापिका अभया भोयर मॅडम, रूपाली वरकडे मॅडम, डॉ. पांडे मॅडम उपस्थित होते.
कार्यक्रम अधिकारी प्रा. महेशकुमार भैसारे यांनी आपल्या अहवाल वाचनातून शिबिराच्या उद्दीष्ट पूर्तीसाठी राबविलेल्या विविध बौद्धिक व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती दिली. ग्रंवासीयांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच गावच्या पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. संचालन डॉ. वानखेडे सर तर आभार प्रदर्शन डॉ. चवळे सर यांनी केले. यावेळी मंचावर उपसरपंच सुधाकरजी डहारे, शा.व्य.स. अध्यक्ष प्रभाकरजी डहारे, तं.मु.स. अध्यक्ष तुकडोजी पुडके, सौ. सुनीता वरकडे, मुख्याध्यापिका अभया भोयर मॅडम, रूपाली वरकडे मॅडम, डॉ. पांडे मॅडम उपस्थित होते. अशा रीतीने गावातील पहिल्याच रासेयो शिबिराची सांगता ग्रामस्थ आणि शिबिरार्थी यांच्या उपस्थितित झाली.
यापूर्वी शिबिराचे उद्घाटन आमदार मा. राजूभाऊ कारेमोरे यांच्या हस्ते पर पडून शिबिराच्या उपक्रमांना सुरुवात झाली. शिबीर उभारणी नंतर शिबीर परिसराची स्वच्छता करण्यात येवून विद्यार्थ्यांचे समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय व क्रांती असे गट पाडण्यात येवून त्यांना दैनंदिन कामाचे नियोजन करण्यात आले. शिबिरार्थी स्वयंसेवकांद्वारे ग्रामसफाई, पथनाट्य, जनसंपर्क, ग्राम सर्वेक्षण, खेळ प्रबोधन, सांस्कृतिक स्पर्धा, गट चर्चा इ. दैनंदिन कार्यक्रमांद्वारे उद्दीष्टपूर्ती करण्यात आली.
दुपारच्या प्रबोधन सत्रात ‘संवैधानिक मूल्ये व भारतीय राजकारण’ या विषयावर श्री. गणेशजी बर्वे, सामाजिक कार्यकर्ता, तुमसर यांचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पोलिस प्रशिक्षण, उद्बोधन व शस्त्रज्ञान या विषयावर आंधळ्गाव चे ठाणेदार श्री. सुरेश मट्टामी व त्यांच्या टीम द्वारा मार्गदर्शन व शस्त्र प्रदर्शन करण्यात आले. ‘अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टीकोण’ या विषयावर श्री. राहुल डोंगरे सर, तुमसर यांनी विविध प्रयोग करून ढोंगी बाबा, बुवाबाजी करणार्यांसचा भंडाफोड केला व गावकरी, महिला वर्ग यांनी अशा अंधश्रद्धांना बळी न पडण्याचे आवाहन केले. तसेच ग्रामीण रुग्णालय, मोहाडी च्या वैद्यकीय टीमद्वारे ‘रोगनिदान व उपचार’ शिबीर आयोजित करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. आशीष माटे, फार्मसीस्ट श्री आशीष कोहळे यांच्या टीम ने बी.पी. शुगर, जनरल चेकअप व औषधोपचार अशा शिबिराचे आयोजन केले. या आयोजनाचा लाभ गावातील बहुसंख्य ग्रामस्थ आणि शिबिरार्थीनी घेतला. सांस्कृतिक कार्यक्रमातून मनोरंजना सोबतच देशभक्ती, महिला अत्याचार, शेतकर्या ची दैना, दारूबंदी, अंधश्रद्धा निर्मूलन, विविध सामाजिक समस्या अशा विविध विषयांवर संदेश व जागृती करण्यात आली.
शिबिराची जबाबदारी शिबीर प्रमुख तथा कार्यक्रम अधिकारी प्रा. महेशकुमार भैसारे, सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सुनील चवळे, सहकार्यक्रम अधिकारी डॉ. गणेश वानखेडे यांनी पार पाडली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील डॉ. पांडे मॅडम, डॉ. पवार सर, डॉ. राऊत मॅडम, डॉ.वरकडे सर, प्रा. जाधव सर डॉ. डाकरे मॅडम व शिबिरार्थी स्वयंसेवक इ. नी सहकार्य केले.