भंडारा येथे साकोली फ्रिडम युथ फाऊंडेशन सन्मानित ; नेहरू युवा केंद्राचे युवा संसद संपन्न
आशिष चेडगे
साकोली तालुका प्रतिनिधी
8605699863
साकोली : नेहरू युवा केंद्र भंडारा वतीने जिल्हास्तरीय “पडोस” युवा संसदेचे आयोजन (०६ एप्रिल) ला भंडारा येथील पोलीस मुख्यालय नियोजन केंद्रात पार पडले. यात उत्कृष्ठ सामाजिक कार्यात भरारी घेणा-या सामाजिक संघटनांचा सत्कार करण्यात आला यात साकोली शहरातील फ्रिडम युथ फाऊंडेशन पदाधिका-यांना सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रमात अध्यक्ष डॉ. श्यामकुमार चरडे प्राचार्य प्रगती महाविद्यालय भंडारा, अतिथी शैलजा वाघ जिल्हा माहिती अधिकारी, भिमराव रंगारी नागपूर, शशिकुमार बोरकर, अनिल महल्ले, नुरचंद पाखमोडे, प्रशांत रामटेके, धर्मेंद्र बोरकर आदी हजर होते. या युवा संसदेत उत्कृष्ठ नेहरू युवा केंद्र कार्यप्रणाली सन २०२१ – २२ मधील सौरभ बोरकर लाखनी, छाया रासेकर लाखांदूर, लक्ष्मी गजभिये भंडारा, शुभांगी बोबडे मोहाडी यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. येथे साकोली फ्रिडम युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर बावणे, कार्तिक मेश्राम, श्रीकांत करंजेकर, श्री राठोड गुरूजी यांचा उत्कृष्ठ सामाजिक कार्यात धडाडीने भाग घेतल्याबाबद सत्कार केला. प्रमुख पाहुण्यांनी नेहरू युवा केंद्रकडून वेळोवेळी घेतलेल्या नियोजनांची माहिती देत याच प्रकारे युवक युवतींनी अग्रेसर राहून सामाजिक क्षेत्रात आपली व आपल्या संघटनेची पकड मजबूत बनविण्याचे आवाहन केले. युवा संसदेत संचालन जोयेश वैद्य यांनी व प्रास्ताविक हितेंद्र वैद्य यांनी केले तर कार्यशाळेत आभार प्रा. अहिरकर यांनी केले. या कार्यक्रमात भंडारा, साकोली, लाखनी, लाखांदूर, तुमसर, मोहाडी, पवनी येथील विविध सामाजिक संघटनेचे युवक युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.