हिंगणघाट पालकांची लूट करणा-या विद्या भवन कान्व्हेंट वर शिक्षण विभागाची मोठी कारवाई.

51

हिंगणघाट पालकांची लूट करणा-या विद्या भवन कान्व्हेंट वर शिक्षण विभागाची मोठी कारवाई.

भारतीय विद्या भवन जी व्ही एम हिंगणघाट शाळेने पालकांकडुन लूटलेले 4 कोटी 46 लाख 42 हजार रुपये पालकांना मीळणार परत.
पालकांची लूट करणाऱ्या भारतीय विद्या भवन जी व्ही एम हिंगणघाट शाळेला पालकांचे 4 कोटी 46 लाख 42 हजार परत करण्याचा शिक्षन विभागाचा आदेश.
2014 ते 2019 दरम्यान पालकांकडून शाळेने 4 कोटी 46 लाख रुपयांची केली होती लूट.

प्रशांत जगताप
वर्धा / हिंगणघाट:- आज शिक्षणाच खाजगीकरण करुन अनेक गरिब मुलाचे आयुष्य बर्बादीच्या उबरट्यावर येऊन ठेपले आहे. दुसरी कडे मदमस्त माजलेल्या खाजगी शिक्षण संस्थेची आर्थिक लूट सुरु आहे.

शिक्षण विभागाने महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळे विरोधातली सर्वात मोठी कारवाई करत, हिंगणघाट येथील भारतीय विद्या भवन गिरधरदास मोहता विद्या मंदिर या शाळेकडून पालकांची 2014 – 2015 ते 2018 – 2019 शैक्षणिक वर्षा दरम्यान ज्यादा शाळा शुल्क वसूल करून केलेली 4 कोटी 46 लाख 42 हजार 206 रुपयांची शाळा शुल्क पालकांना परत करण्याचा आदेश केला आहे. शाळेकडून पालकांची केलेलीं लुटीची रक्कम 4 कोटी 46 लाख 42 हजार रुपये भारतीय विद्या भवन जी व्हीं एम शाळेने पुढील एका महिन्याच्या आत पालकांना परत करावी असा आदेश शिक्षन उपसंचालक नागपुर विभाग यांनी दिनांक 9 नोव्हेंबर 2020 रोजी निर्गमित केला आहे.

हिंगणघाट येथील भारतीय विद्या भवन जी व्हि एम शाळे विरुद्ध पालकांकडून शिक्षण विभागाला तक्रारी करण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने शिक्षण विभागाने तपासणी पथकाचे गठन करून शाळेची चौकशी केली. चौकशी दरम्यान महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम 2011 व महाराष्ट्र शैक्षणिक संस्था नियमावली 2016 यामधील विविध कलमांचे आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट निदर्शनात आले. तपासणी दरम्यान संस्थेने जमा खर्चाचे विवरण पत्र दिले नसल्याचे निदर्शनात आला मुळे चौकशी अहवाल अंतिम करता येऊ शकला नव्हता. यानंतर परत शाळेला व संस्थेला याबाबत सूचना करत संधी देण्यात आली, तसेच संस्था चालक व मुख्याध्यापक यांना बोलवण्यात देखील आले होते. संस्थेचे मुख्याध्यापक तसेच सचिव यांना शिक्षणं विभागाकडून परत दिलेल्या संधी नुसार चौकशीसाठी उपस्थित होत आपले म्हणणे मांडले .यानंतर जमा खर्चाचे विवरणही सादर केले .चौकशी अहवाल व संस्थेचे म्हणने विचारास घेऊन शिक्षण उपसंचालक यांनी शाळेकडून पालकांची केली गेलेली लूट ही 4 कोटी 46 लाख 42 हजार 206 रुपयांची रक्कम निश्चित करून ही ज्यादा वसूल केली गेलेली रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना परत करावी असे आदेश दिलेले आहे.

शिक्षण विभागाकडून उचित न्याय मिळावा यासाठी पालकांनी शिक्षण राज्यमंत्री यांची याबाबत वारंवार मदत घेतली. शिक्षण राज्यमंत्री यांनी शिक्षण विभागाकडून या प्रकरणात स्वतः लक्ष घालत पालकांची झालेली पिळवणूक पालकांना वापस मिळावी म्हणून शिक्षण विभागाकडून ही कारवाई लवकरात लवकर करून घेतल्याने पालकांकडून शिक्षण राज्यमंत्री नामदार बच्चू कडू यांचे आभार मानले जात आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळेवर शिक्षण विभागाकडून आत्तापर्यंत केल्या केलेल्या कारवाईमध्ये ही कारवाई सर्वात मोठी आहे. भारतीय विद्या भवन जी व्ही एम हिंगणघाट या शाळेने शासनाच्या नियमाला डावलुन सन 2014 ते 2019 या कालावधी दरम्यान दरवर्षी शाळा शुल्कात वाढ केली होती. शासनाच्या नियमानुसार दर दोन वर्षातून एकदाच 15 टक्या पर्यंत कार्यकारी पालक शिक्षण समितीची मंजुरी घेऊन शाळा शुल्क वाढविता येते. मात्र भारतीय विद्या भवन शाळेने दरवर्षी शासनांच्या नियमाला डाऊन शाळा शुल्क मध्ये मोठी वाढ केली होती. याचप्रमाणे पी टी ए व ई पी टी ए ची स्थापना करण्यात आलेली नव्हती. शाळेकडून शैक्षणिक शुल्कावर विलंब शुल्क आकारण्यात येत होता. पाठ्यपुस्तके व नोटबुक, इतर साहित्य शाळेच्या परिसरात अवाजवी किमतीने विक्री करण्यात येत होते. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली सक्तीने फी वसुली करण्यात येत होती. मान्य नसलेल्या बाबींवर फी आकारणे जसे अमलगमेटेड फंड, ॲक्टिविटी चार्ज या बाबींवर देखील फी आकारली जात होती. हिंगणघाट येथील पालक समितीच्यावतीने याबाबत निवेदन देखील शिक्षण विभागाला दिले होते.