महाड मध्ये एस टी महामंडळाच्या जागेतील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात

महाड मध्ये एस टी महामंडळाच्या जागेतील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात

महाड मध्ये एस टी महामंडळाच्या जागेतील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात

✍ रेश्मा माने ✍
महाड शहर प्रतिनिधी
८६००९४२५८०

महाड – महाड एसटी स्थानकाच्या समोर मुंबई गोवा महामार्गापर्यत असणार्‍या एस टी महामंडळाच्या जागेत अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या टपर्‍या व बेकायदेशीर बांधकामे आज विभागीय कार्यालयामार्फत पोलिस बंदोबस्तामध्ये हटवण्यास सुरुवात केली आहे.
महाड एसटी स्टँड समोरील रस्त्यावर, त्याच प्रमाणे मुंबई गोवा महामार्ग ते एस टी स्टॅन्ड दरम्यान असणार्‍या एस टी महामंडळाच्या जागेत अतिक्रमण करून छोट्या मोठ्या टपर्‍या व शेड उभारण्यात आल्या होत्या. गेली अनेक वर्षापासून या बेकायदेशीर बांधकाम व टपरीधारकांना कायदेशीर नोटीसा बजावून अतिक्रमण हटवण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र आजवर ही बेकायदेशीर बांधकामे हटवली गेली नव्हती. आज पेण विभागीय कार्यालयामार्फत विभागीय नियंत्रक श्रीमती अनघा बारटक्के यांच्या नेतृत्वाखाली एस ओ. पाखरे, बांधकाम अभियंता कांबळे, महाड आगार प्रमुख शिवाजी जाधव यांच्या उपस्थितीत पोलिस बंदोबस्तामध्ये मुंबई गोवा महामार्गावर मच्छी विक्रेते व अन्य व्यावसायिकांनी बेकायदेशीर रित्या उभारण्यात आलेल्या एस टी महामंडळाच्या जागेतील टपर्‍या व शेड हटवण्यात आले.