सेंट झेवियर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज व सिस्केप संस्था महाड यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचे निसर्ग निवासी शिबिर संपन्न

सेंट झेवियर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज व सिस्केप संस्था महाड यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचे निसर्ग निवासी शिबिर संपन्न

सेंट झेवियर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज व सिस्केप संस्था महाड यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचे निसर्ग निवासी शिबिर संपन्न

✍ रेश्मा माने ✍
महाड शहर प्रतिनिधी
८६००९४२५८०

महाड – इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा नुकतीच संपली. सेंट झेवियर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेने दोन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये एकूण 90 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला . सिस्केप संस्थेच्या माध्यमातून या शिबिराचे संपूर्ण नियोजन करण्यात आले होते. संध्याकाळी पाच वाजता विद्यार्थ्यांचे स्वागत आणि नोंदणी करण्यात आली. दिवेकर वाडी आणि चोचिंदे गवळवाडी येथे विद्यार्थ्यातर्फे गावातील प्रत्येक घरांमध्ये चिमणीचे घरटे लावण्यात आले . यावेळी विद्यार्थ्यांनी स्थानिकांशी संवाद साधला व प्रश्नावली तयार करून चिमणी बद्दल ची माहिती गोळा केली. तसेच ग्रामीण जीवनशैलीचा फार जवळून अभ्यास केला . गोठ्यातील शेण आणि गवताचा पेंडा यांचे तयार केलेले खत शिवाय शेण पोळ्या विद्यार्थ्यांनी बघितल्या . बैलगाडी गावातील घरांमध्ये शेणाने सारवलेले अंगण त्यावर टाकलेले मांडव आदी अनेक बाबी विद्यार्थ्यांनी समजून घेतल्या . यावेळी कचरा व्यवस्थापन नैसर्गिक खत शेती या विषयांवर गणेश खातू व समृद्धी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . तर चार विद्यार्थ्यांचा एक गट तयार करून त्याने चिमणीचे घरटे बसवणे आणि सदर माहिती संकलित करणे असा प्रकल्प देण्यात आला . याविषयी संस्थेचे पदाधिकारी राकेश मेहता आणि अविनाश घोलप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गवळवाडी चोचिंदे येथे मुलांनी पक्षीनिरीक्षणाचा आनंद घेतला. संध्याकाळी पोलीस अधीक्षक श्री तांबे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात स्पर्धा परीक्षांविषयी कशी तयारी करायची याचे मार्गदर्शन केले . यावेळी शाळेचे संस्थापक श्री डिसूजा आणि मुख्याध्यापिका सौ इसाबेल डिसूझा यांनी उपस्थितांचे स्वागत केले . रात्री दहा वाजता विद्यार्थ्यांनी जंगल भटकंती केली . यामध्ये रात्रिंचर , घुबड अशा पक्षांचे निरीक्षण केले . सुमित याने विद्यार्थ्यांना तारांगण निरीक्षण या विषयी माहिती दिली. दुर्बिणीच्या सहाय्याने त्याने विद्यार्थ्यांना तारकापुंज , ग्रह आणि इतर खगोलीय माहिती दिली. पहाटे 5 वा. विद्यार्थ्यांना चिराग मेहता, ओम , प्रतीक, यश, अनुराग, श्रद्धा जोशी, आदिती, सारा राऊत आणि काव्या या सिस्केप सहकार्यांनी विद्यार्थ्यांना पर्वतारोहण आणि गिर्यारोहण भटकंती घडवून आणली. शाळेच्या सर्व शिक्षक वृंद आणि सहकार्यांनी उत्तम भोजन व निवासी व्यवस्था केली. शिबिरा अंती विद्यार्थी प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सीमा हेलेकर यांनी सर्वांचे आभार मानले.