आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या हस्ते नागभीड तालुक्यातील ग्रा.पं. मेंढा (किर.) तर्फे ५ % अपंग कल्याण निधीतून अपंग लाभार्थ्यांना साहित्यांचे वाटप..
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभिड-दि. ७ एप्रिल/ आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या हस्ते नागभीड तालुक्यातील ग्रा.पं. मेंढा (किर.) तर्फे ५ % अपंग कल्याण निधीतून अपंग लाभार्थ्यांना साहित्यांचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, ग्रा.पं. मेंढा (किर.) च्या वतीने आ. बंटीभाऊ भांगडीय यांचे आगमनाप्रित्यर्थ स्वागत करण्यात आले. तसेच, आ. बंटीभाऊ भांगडीया यांनी उपस्थित ग्रामस्थांना विविध विषयांवर संबोधित केले व एकूण २२ अपंग लाभार्थ्यांना सिलिंग फॅन चे वाटप केले.
यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य वसंतभाऊ वारजूकर, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष रडके, कृ.ऊ.बा. समिती सभापती आवेश पठाण, न.प. नागभीड बांधकाम सभापती सचिन आकुलवार, सरपंच आनंद कोरे, उपसरपंच्या व इतर भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.