एसएफडीआरच्या यशस्वी चाचणीमुळे हवेतून हवेत मारा करणाऱ्या सैन्यातील क्षेपणास्त्रांचा पल्ला वाढवता येईल

मीडिया वार्ता न्यु
८ एप्रिल, मुंबई: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ ) 08 एप्रिल 2022 रोजी , ओडिशाच्या किनार्‍यावरील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रातून  (आयटीआर )घन इंधन वाहिनी रॅमजेट तंत्रज्ञान (सॉलिड फ्यूएल डक्टेड रैमजेट )  चाचणी यशस्वी झाली. या चाचणीने जटिल क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व महत्त्वपूर्ण घटकांचे विश्वासार्ह कार्यान्वयन  यशस्वीरित्या दाखवून दिले  आणि मोहिमेची सर्व उद्दिष्टे पूर्ण केली.

स्वनातीत वेगाने खूप लांब अंतरावरील  हवाई धोके रोखण्यासाठी एसएफडीआर-आधारित प्रक्षेपक असलेली  क्षेपणास्त्र सक्षम आहे. आयटीआरने तैनात केलेल्या टेलीमेट्री, रडार आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रॅकिंग प्रणालीसारख्या  अनेक श्रेणी साधनांद्वारे टिपलेल्या  माहितीवरून प्रणालीच्या  कार्यक्षमतेची खात्री करण्यात आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा, हैदराबाद यांनी संशोधन केंद्र  इमरात, हैदराबाद आणि उच्च शक्ती सामग्री संशोधन प्रयोगशाळा, पुणे.यांच्या सहकार्याने घन इंधन  रामजेट तंत्रज्ञान (एसएफडीआर ) विकसित करण्यात आले आहे.

 

या ट्रेंडिंग बातम्या आपण वाचल्यात का?

 

एसएफडीआर यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचे  अभिनंदन केले आहे.देशातील महत्वाच्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या विकासासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रचना , विकास आणि चाचणीमध्ये सहभाग असलेल्या चमूची प्रशंसा करत, संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ जी सतीश रेड्डी म्हणाले की ,एसएफडीआरच्या यशस्वी चाचणीमुळे हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा पल्ला  वाढवता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here