नांदेडात आरोपीचा पोलिसांवर हल्ला, पोलिसाचा गोळीबार

नांदेडात आरोपीचा पोलिसांवर हल्ला, पोलिसाचा गोळीबार

नांदेडात आरोपीचा पोलिसांवर हल्ला, पोलिसाचा गोळीबार

बालाजी पाटील
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
9420413391
9421808760

नांदेड : नांदेडचे ग्रामीण पोलिस गुंडाचा शोध घेण्यासाठी गेले असता पोलिस आपल्याकडे येत असल्याचे पाहून गुंड संजूसिंग उर्फ राजूसिंग बावरी याने थेट पोलिसांवरच तलवारीने हल्ला केला. त्यास प्रत्युत्तर म्हणून पोलिस निरीक्षक घोरबांड यांनी केलेल्या गोळीबारात गुंड आणि आरोपी जखमी झाला. पोलिसांनी थेट त्याच्या पायावर गोळीबार केल्याने तो जखमी झाला आहे. नांदेडमध्ये बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येनंतर दोनच दिवसांत गोळीबाराची घटना घडल्याने पुन्हा शहरात खळबळ उडाली आहे.

नांदेड ग्रामीणचे पोलिस गुंड आणि आरोपी संजूसिंग ऊर्फ राजूसिंग बावरी याचा शोध घेण्यासाठी पोलिस गेले होते. पोलिस आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून बावरी याने थेट पोलिसांच्या गाडीवर तलवारीने हल्ला करून गाडीची काच फोडली आणि तलवारीने हल्ला केला. यात पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी पाटील जखमी झाले. त्यातच पुन्हा हल्ला करण्याआधीच पोलिस निरीक्षक अशोक घोरबाड यांनी स्वत:जवळील पिस्तूलाने गुंड बावरी याच्या कमरेखाली गोळीबार केला. त्यात तो जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.