भंडारा येथील बन्सीलाल लाहोटी नूतन महाराष्ट्र विद्यालयात ऑरो मशीनचे लोकार्पण सोहळा संपन्न
✍ भवन लिल्हारे ✍
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8308726855,8799840838
भंडारा :- विदर्भात भंडारा जिल्हा हा नावाजलेला शहर आहे. आज भंडारा येथील बन्सीलाल लाहोटी नूतन महाराष्ट्र विद्यालयात थंड पिण्याच्या पाण्यासाठी ऑरो मशीनचे लोकापेण सोहळा सौ. गिताबाई राठी व संस्थेचे सचिव मा. रविंन्द्र भालेराव यांच्या हस्ते संपन्न झाले.
नूतन महाराष्ट्र विद्या विकास मंडळाचे संस्थापक सदस्य बाबासाहेब फडणवीस यांच्या स्मरणार्थ शिक्षिका अनुराधा फडणवीस यांनी एक आरो फिल्टर पाण्याची मशीन दिली. तर पुनमचंद राठी व भीवराज कलंत्री यांच्या स्मरणार्थ संगिता राठी यांनी ऑरो पाण्याची मशीन उपलब्ध करून दिली.
ही मशिन शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत थंड पिण्याचे पाणि मिळावे व रोगराईपासुन मुक्त व्हावे व विद्यार्थांना शुद्ध पिण्याचे पाणि मिळाव या करीता देण्यात आली आहेत.
या लोकार्पण सोहळामध्ये प्रामुख्याने उपस्थित संस्थेचे सचिव मा. रविन्द्र भालेराव, मा. राधेश्याम लाहोटी, सौ. गिताबाई राठी, विजय राठी, मुख्याध्यापक
मा. राजु बारई, उपस्थित होते.
याप्रसंगी आदर्श विद्यार्थी शुभम भोयर, रोहीत साकुरे, या विद्यार्थ्यांना सम्मानित करण्यात आले. संस्था सचिव रविन्द्र भालेराव यांनी ऑरो आणि थंड पाण्याची मशीन शाळेला दिल्याबद्दल संस्थेच्यावतीने त्यांचा आभार मानण्यात आले.
मुख्याध्यापक बारई यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ऑरो पाण्याची मशीन उपलब्ध झाल्याने शिक्षिका अनुराधा फडणवीस व संगिता राठी यांचे शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आले. शाळेत ग्रामिण भागासह शहरी भागातील विद्यार्थांची संख्या भरपूर प्रमाणात असल्यामुळे शाळेकडून विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती मुख्याध्यापक बारई यांनी दिली.
व संपूर्ण आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व आभार माणून लोकार्पण सोहळा समाप्त झाल्याची घोषणा करण्यात आली