अखेर त्या मुलीची ओडख पटली

अखेर त्या मुलीची ओडख पटली

अखेर त्या मुलीची ओडख पटली

खुशाल सूर्यवंशी
राजुरा तालुखा प्रतिनीधी
8378848427

राजुरा : -4 एप्रिलला भद्रावती येथे तेलवसा मार्गावरील मक्रोन शाळेच्या मागील परिसरात ओसाड शेतात एका 22 वर्षीय युवतीचा शीर नसलेला मृतदेह आढळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. घटनस्थळावरून प्राप्त पुराव्यांवरून सदर युवतीची हत्या झाल्याचे उघड होते मात्र हत्या झालेल्या युवतीची ओळख पटू नये म्हणून त्या क्रुरकर्म्यांनी चक्क युवतीचे शीर कापुन नेले होते.

एव्हढ्यावरच समाधान झाले नसल्याने त्या युवतीला निर्वस्त्र करून तिचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. पोलीस स्टेशन भद्रावती येथे अज्ञात इसमांविरुध्द अपराध क्रमांक १४१ / २०२२ कलम ३०२, २०१ भादंविचा गुन्हा नोंदविण्यात येऊन तपास सुरू करण्यात आला होता अखेर तपासला यश प्राप्त झाले असुन पोलिसांना तरुणीची ओळख पटविण्यात यश मिळाले असुन पोलिसांना काही संशियत लोकांची माहिती प्राप्त झाल्याचे सूत्रांकडून कळले असुन ते संशयित आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत हे विशेष.