गोंडपिपरी तालुक्यात दिवसाढवळ्या वाघाचा हल्ला, दहा बैल दोन म्हशी ठार
वाघाचा हल्ला मुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वनविभाग गाट झोपेत दि 10 एप्रिल 2022
राजेंद्र झाडे
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
चंद्रपूर: गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव, आर्वी, वेजगाव परिसरात वाघाने धुमाकूळ घातला आहे. वाघाचा हल्ला मधे तोहोगाव येथील गोशाळेतील दहा बैलाचा बळी घेतला तर, रविवारी आर्वी व वेजगाव येथे सकाळी ८ वाजताच्या सुमारास दोन म्हैस ठार केल्या व एक बैल गंभीर जखमी झाला आहे. यामुळे परिसरातील नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाघाचा हल्ल्यात जखमी बैल
सदर वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव, आर्वी, वेजगाव परिसरात वाघाने धुमाकूळ घातला असून भरदिवसा गावात येऊन जनावरांवर हल्ला करीत आहे. तोहोगाव येथील गो शाळेवर हल्ला करून दहा बैलांचा जीव घेतला आहे. तर आर्वी येथील दोन म्हशी सुद्धा ठार केल्या आहे.
दिवसाढवळ्या वाघाचा धुमाकूळ घालत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यावर मात्र, वन विभाग सुस्त आहे. वाघाला जंगलात पिटाळून लावण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्वरित वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.