महाड पंचायत समिती इमारतीमध्ये घाणीचे साम्राज्य-अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष
✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९
महाड(रायगड):-महाड पंचायत समिती ची जुनी इमारत कमकुवत झाल्याने इतर ग्रामीण विकास कार्यक्रम पंचायत राज अंतर्गत सन २०११ मध्ये नवीन प्रशासकीय इमारतीला मंजुरी देण्यात आली त्याअंतर्गत ठेकेदार मे.पार्वती कन्स्ट्रक्शन महाड यांनी सन २०१५ मध्ये काम पुर्ण करुन २९/४/२०१६ मध्ये तात्कालीन केंद्रीय मंत्री अनंत गीते, ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे, मंत्री दिपक केसरकर, पालकमंत्री प्रकाश मेहता, आ.भरत गोगावले यांच्या हस्ते उद्घाटन झाले व कार्यालय स्थलांतरित करण्यात आले असता २२ व २३ जुलै २०२१ रोजी महाड येथे महापूर आला होता त्यामध्ये सदरील इमारतीमध्ये पाणी गेले असल्याने इमारतीचे काही प्रमाणात नुकसान झाले परंतु फक्त ५ वर्ष झालेली इमारत २० वर्षांची घटका मोजताना दिसत आहे त्यामुळे बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे तसेच तालुक्यातील १३४ ग्रामपंचायतींचा कारभार चालवणाऱ्या पंचायत समितीमध्ये आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेविका, नागरिक, कामानिमित्त वारंवार येत असतात परंतु शौचालयाची परिस्थिती अतिशय गंभीर असून कार्यालयात दुर्गंधी पसरली आहे स्वच्छतेचा अभाव आहे त्याठिकाणी महाड तालुका आरोग्य अधिकारी असताना देखील या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते ही सर्वस्वी जबाबदारी गटविकास अधिकारी यांची असून देखील कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही अश्या प्रकारची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे