मारेगांव तांदळाचा संशयास्पद ट्रक पकडला,पांढरकवडा पोलिसांची धडक कारवाई

 

मारेगांव तांदळाचा संशयास्पद ट्रक पकडला,पांढरकवडा पोलिसांची धडक कारवाई

मारेगांव तांदळाचा संशयास्पद ट्रक पकडला,पांढरकवडा पोलिसांची धडक कारवाई

राजेंद्र झाडे
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177

पांढरकवडा: सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय महाले व त्यांचे पोलीस पथक पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, आदिलाबाद तेलंगाना मार्गाने नागपुर कडे नॅशनल हायवेने ट्रक क्रमांक UP 25 CT 2121 मध्ये तांदुळ भरून घेवुन जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक जगदिष मंडलवार यांचे आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय महाले पोलीस कर्मचारी शरद शिवणकर, राजु बेलयवार, राजु मुत्यालवार यांनी कोंघारा फाटा जवळील रामदेवबाबा पेट्रोलपंपाजवळील रोडवर ट्रक क्र. UP 25 CT 2121 यास थाबवुन ट्रक चालकाला पोलिसांनी नाव विचारले असता त्याने आपले नाव मोहम्मद हर्शद अफसर हुसेन वय 25 वर्ष रा. दुनका तहसिल मिरगंज जि. बरेली राज्य युपी असे सांगुन ट्रकमध्ये तांदुळ असुन ते हैद्राबाद येथे भरुन नंतर गोंदिया घेवुन जात असल्याचे सांगीतले त्यावरून त्यास पोलीसांनी मालाच्या बिल व ट्रान्सपोर्ट बिल मागीतले असता त्याने तांदळाचे झेराॅक्स प्रति बिल दिल्याने तसेच ट्रान्सपोर्ट बिल मागीतले असता त्याचेकडे नसल्याचे सांगीतले वरून पोलीसांनी सदर ट्रक व संशयास्पद आढळून आला असुन तांदुळ पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे येथे जमा करण्यात आला असुन या घटनेची माहिती केळापुर तहसीलदार यांना संपर्क साधुन तांदळाची माहिती देण्यात आाली त्यांनतर दोन सरकारी पंचासमक्ष पोलीस ठाण्यात डिटेन करण्यात आलेल्या ट्रक व तांदळाचा पंचनामा केला असता त्यामध्ये पांढरया रंगाचे नाॅयलानची पोत्यामध्ये चालकाचे सांगणेप्रमाणे एकुण अंदाजे 600 पोेते ज्यामध्ये जाड तांदुळ वजन अंदाजे 310 क्विंटल किंमत अंदाजे 6,38,600 रूपयाचे तांदुळ मिळुण आले. सदर तांदळाचे पंचासमक्ष वेगवेगळया प्लास्टीकच्या पन्नीत 10 सॅम्पल घेण्यात आले असुन सदर सिलबंद तांदळाचे सॅम्पल जिल्हा व पुरवठा अधिकारी, यवतमाळ, अन्न व पुरवठा निरीक्षक, केळापुर,यांचेकडे तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आले आहे.
ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील- भुजबळ, यवतमाळ अपर पोलीस अधिक्षक खंडेराव , पांढरकवडा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदिप पाटील, पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय महाले, पोलीस कर्मचारी शरद शिवणकर, राजु बेलयवार, राजु मुत्यालवार यांनी ही कारवाई केली असु याघटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय महाले हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here