रायगड श्रीवर्धन पोलीस स्टेशनकडून आगामी सणांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज.
✍ रशाद करदमे ✍
श्रीवर्धन कोकण प्रतिनिधी
!! मिडीया वार्ता न्युज !!
📱 9075333540 📱
श्रीवर्धन : – कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली असल्याने लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आल्याने गेल्या दोन वर्षानंतर यावर्षी लोकांनी मोकळेपणाने सण साजरा करत आहेत. धुलिवंदनचा व होळी सण श्रीवर्धनमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करून मनसोक्त आनंद लुटले. त्याच पाठोपाठ येणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, हनुमान जयंती, रमजान ईद सण सुद्धा मोठया प्रमाणात साजरे करण्यात येतात तरीही अशावेळी नागरिकांनी नियमांचे पालन करावे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस व्यवस्थेची यंत्रणा चोख काम बजावत आहे.
या अंतर्गतच आज सकाळी पाऊणे अकराच्या सुमारास श्रीवर्धन पोलीस ठाणे हद्दीत पोलीस दलाकडून रूटमार्च काढण्यात आला. श्रीवर्धन पोलीस ठाण्यापासून सुरुवात झालेल्या रूट मार्चचा मार्ग -शिवाजी चौक – बाजारपेठ – कासिम राऊत चौक – पेशवे स्मारक – जोशी चौक – बस स्टँड असा होता.
रूट मार्चची सकाळी ठिक अकरा वाजता सुरुवात होऊन तो दुपारी सव्वा बारा वाजता संपवण्यात आला. जवळपास दीड तास चाललेल्या या मार्चमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी,पोलीस उप अधीक्षक श्री. प्रशांत स्वामी साहेब, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर साहेब, पोलीस उप निरीक्षक श्री उमेश खिराड साहेब. तसेच १० अंमलदार आणि एक एसआरपीफच्या प्लाटूनने सहभाग घेतला होता. तालुक्यात साजरे होणाऱ्या सणांची जय्यत तयारी नागरिकांकडून सुरु आहे. या दरम्यान प्रशासनाने जाहीर केलेले नियम पाळण्याचे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आलेले आहे.