गोंडवन विकास संस्थेच्या अध्यक्षपदी श्री राजाभाऊ देशपांडे यांची तर सचिवपदी श्री.रवींद्रजी जनवार यांची अविरोध निवड.

गोंडवन विकास संस्थेच्या अध्यक्षपदी श्री राजाभाऊ देशपांडे यांची तर सचिवपदी श्री.रवींद्रजी जनवार यांची अविरोध निवड.

गोंडवन विकास संस्थेच्या अध्यक्षपदी श्री राजाभाऊ देशपांडे यांची तर सचिवपदी श्री.रवींद्रजी जनवार यांची अविरोध निवड.

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731

नागभिड : -गोंडवन विकास संस्था नागभीडची सर्वसाधारण आमसभा दि.09/04/2022 रोजी संस्थेचे कार्यालय असलेल्या कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नागभीड येथे पार पडली. यात पुढील पाच वर्षासाठी नवीन कार्यकारिणी ची निवड करण्यात आली.त्यात संस्थेचे जेष्ठ सदस्य राजाभाऊ देशपांडे यांची अध्यक्ष म्हणून तर सचिवपदी श्री.रवींद्रजी जनवार यांची चौथ्यांदा एकमताने निवड करण्यात आली.
श्री.रवींद्रजी जनवार हे संस्थेचे संस्थापक सचिव स्व.श्री.जयसिंहजी जनवार यांचे सुपुत्र असून ते उच्चशिक्षित व कार्यकुशल व्यक्तिमत्त्व आहेत.मागील 2006 पासून श्री.रवींद्रजी जनवार हे सचिवपदी कार्यरत असून संस्थेअंतर्गत संचालित तीन विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय व मुलांच्या दोन वसतिगृहाचे उत्तम व्यवस्थापन त्यांनी केले आहे.
मागील 15 वर्षातील त्यांच्या नेतृत्वात संस्थेनी केलेली यशस्वी वाटचाल व संस्थेद्वारा संचालित सर्व प्रतिष्ठानांची झालेली सर्वांगीण प्रगती याची दखल घेत संस्थेच्या सदस्यांनी पुनःश्च त्यांना नेतृत्व देण्याचा निर्णय करीत एकमताने त्यांच्याकडे चौथ्यांदा संस्थेच्या सचिवपदाची धुरा सोपविली.
यांच्यासोबतच संस्थेच्या कार्यकारी मंडळात उपाध्यक्षपदी अँड.प्रमोदजी बोरावार,श्री.प्रशांतजी हिवसे सहसचिव,कार्याध्यक्ष श्री.राजन जयस्वाल तसेच संचालक म्हणून श्री.वसंतराव पोशट्टीवर,सौ.वर्षाताई रवींद्रजी जनवार,सौ.शोभाताई चिल्लूरे मॅडम,श्री.सतिशजी रेंगे ,श्री.प्रदीपजी फडणवीस,श्री. सुनीलजी देशमुख यांचा समावेश करण्यात आला.
संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळ यांचे कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नागभीड चे प्राचार्य श्री.देविदास चिलबुले सर,पर्यवेक्षक इडपाचे सर, सर्व प्राध्यापक, शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.