आ. बंटीभाऊ भांगडीया यांची नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथे श्रीरामनवमी निमित्त आयोजित शोभायात्रेला भेट
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभिड–दि. १० एप्रिल/ आ. बंटीभाऊ भांगडीया यांनी नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथे श्रीरामनवमी निमित्त आयोजित शोभायात्रेला भेट दिली. दरम्यान, उपस्थित माता-भगिनींनी आ. बंटीभाऊ भांगडीया यांचे औक्षण केले तसेच, भगवी टोपी व दुपट्टा प्रदान करून विशेष स्वागत करण्यात आले.
सदर शोभायात्रेत आ. बंटीभाऊ भांगडीया यांनी श्रीरामभक्तगणांसमवेत सहभागी होऊन पालखीचे दर्शन घेतले आणि शोभायात्रेतेमधील विशेष आकर्षण असलेल्या झांकीमध्ये अवतारीत भगवान श्रीराम, लक्ष्मण, माता सीता व भगवान हनुमान यांना पुष्पहार अर्पण केला तसेच शोभायात्रेत सहभागी वयोवृद्धांशी वार्तालाप केला.
यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजुकर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे, भा.ज.यु.मो. प्रदेश सचिव मनिष तुम्पल्लीवार, माजी नगरसेवक सतीश जाधव, राजेश घिये, अशोक ताटकर, दिलीप कामडी, ईश्वर कामडी, सुधाकर कामडी, अनिकेत नारखेडे व इतर भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि स्थानिक श्रीरामभक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.