गांजा विक्री करणाऱ्यास अटक
✍रेश्मा माने ✍
महाड शहर प्रतिनिधी
८६००९४२५८०
महाड : -महाड तालुक्यामधील बिरवाडी औद्योगिक क्षेत्रातील आसनपोई गावात गांजा विक्री करणाऱ्या गावातील एका इसमाला स्थानिक गुन्हे अन्वेष शाखा रायगड यांनी १०/४/२०२२ रोजी २०८५ ग्राम गांजा सह अटक केली आहे .
महाड तालुक्यातील असनपोई गावात एस टी बस स्टॉप च्या मागील बाजूला गांजा विक्रीचा धंदा करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेष शाखा रायगड यांना मिळाली होती.त्या प्रमाणे १०/४/२०२२ रोजी त्यांनी सापळा रचला सायंकाळी ७:३०ते ९ वाजण्याच्या दरम्यान त्या ठिकाणी असलेले रमेश सखाराम म्हस्के यांची स्थानिक गुन्हे अन्वेष शाखेचे अधिकारी शामराव जयंसिग कराडे यांनी झडती घेतली असता म्हस्के यांच्या कडे २०८५ ग्राम, २४००० एवढ्या रकमेचा विक्री साठी आणलेला गांजा मिळाला.गांजा जप्त करून आरोपी याला ताब्यात घेत गुंगीकारक औषधी द्रव्य व मादक पदार्थांचा व्यापार केल्याप्रकरणी मादक पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(क),२०(ब)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.