रात्री कुटुंबासोबत झोपलेली महिला सकाळी आढळली मृतावस्थेत

रात्री कुटुंबासोबत झोपलेली महिला सकाळी आढळली मृतावस्थेत

रात्री कुटुंबासोबत झोपलेली महिला सकाळी आढळली मृतावस्थेत

 

राजेंद्र झाडे
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177

राजुरा :-तालुक्यातील राजूर कॉलरी येथे किरायाच्या घरात रहात असलेल्या एका कुटुंबातील महिला राहत्या घरीच मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना आज ११ एप्रिलला पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत राजूर ईजारा येथील पोलिस पाटिल यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या माहिती वरून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा करित मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पोलिसांना महिलेचा मृतदेह घरातील दिवाणावर संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने महिलेच्या पतीला पोलिसांनी चौकशी करिता ताब्यात घेतले आहे. महिलेने आत्महत्या केली की, तिचा घातपात झाला हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल.
राजूर कॉलरी येथे किरायाच्या घरात रहात असलेल्या राकेश बाबुलाल केवट याची पत्नी संगीता उर्फ राणी राकेश केवट (२३) ही राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली. रात्री कुटुंबासह झोपलेली संगीता घरातील दिवाणावर मुतावस्थेत पडून होती. याबाबत पोलिस पाटिल वामन बलकी यांनी पोलिस स्टेशनला माहिती दिल्यानंतर तत्काळ पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मृत महिलेचा पती राकेश केवट याने त्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. पण संगीता दिवाणावर मृतावस्थेत आढळून आल्याने पोलिसांना तिचा मृत्यू संशयास्पद वाटला. त्यामुळे पोलिसांनी संगीताचा पती राकेश केवट याला चौकशी करिता ताब्यात घेतले. मृतक संगीता केवट हिने काही महिन्यांपूर्वी राकेश केवट याच्या भावावर अत्याचाराचा आरोप केला होता. त्याला पोलिसांनी अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली होती. तिचा असा हा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने गावात चर्चेला उधाण आले आहे. संगीता केवट हीचा मृत्यू नेमका कशाने झाला हे आता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. घटनेचा तपास ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनात पोलिस करित आहे.