चुकिची माहिती प्रसारीत करून जनतेची दिशाभूल करणाऱ्या भंडारा बीजेपी या फेसबुक पेज चालवणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करा अशी मागणी भंडारा पोलीसांना दिले निवेदन, गुन्हा दाखल न झाल्यास युवक काँग्रेस च्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा

चुकिची माहिती प्रसारीत करून जनतेची दिशाभूल करणाऱ्या भंडारा बीजेपी या फेसबुक पेज चालवणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करा अशी मागणी

भंडारा पोलीसांना दिले निवेदन, गुन्हा दाखल न झाल्यास युवक काँग्रेस च्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा

चुकिची माहिती प्रसारीत करून जनतेची दिशाभूल करणाऱ्या भंडारा बीजेपी या फेसबुक पेज चालवणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करा अशी मागणी भंडारा पोलीसांना दिले निवेदन, गुन्हा दाखल न झाल्यास युवक काँग्रेस च्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा

✍ भवन लिल्हारे ✍
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8308726855,8799840838

भंडारा :- सविस्तर वृत्त येणेप्रमाणे आहे की, भंडारा जिल्हा लाखनी तालुक्यातील मौजा सोमलवाडा मेंढा पोष्ट रेंगेपार येथील एक तरुण नामे क्रिष्णा शालिकराम अतकरी याने दिनांक १० एप्रिल २०२२ रोजी आपल्या वैयक्तिक कारणामुळे आत्महत्या केली. परंतु जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कुठलीही माहिती न घेता महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष जिल्ह्याचे नेते मा.आ. नानाभाऊ पटोले साहेब यांची व महाविकास आघाडी सरकारची नहाक बदनामी करत भंडारा जिल्ह्यातील महावितरण या आत्महत्येला कारणीभूत आहे असे चुकीचे वक्तव्य करीत bhandara bjp या फेसबुक पेजवरून त्यांनी पोष्ट केली. करीता चुकीची बातमी प्रसारीत करून जिल्ह्यातील जनतेची दिशाभूल केल्याबद्दल bhandara bjp या फेसबुक पेज चालविणाऱ्या व्यक्ती विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करूण त्याला अटक करण्यात यावी.
गुन्हा दाखल न झाल्यास भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा आशयाचे निवेदन भंडारा पोलीस स्टेशन येथील पोलीस निरिक्षक सुभाष बारसे यांना देण्यात आले.
या प्रसंगी भंडारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पवन वंजारी, बालू ठवकर, भंडारा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आकाश ठवकर, विनित देशपांडे, मोहन निर्वाण, रुणाल राऊत, पोमेश चिलमकर, आकीब पठान, इरफान ‘ पटेल, गिरीश ठवकर, राधे भोंगाडे, निरज कारेमोरे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते निवेदन देतांनी उपस्थित होते.