भंडारा जिल्हा मुस्लिम लायब्ररी चौकात सर्व धर्म समभाव असल्याचे झाले दर्शन श्रीराम नवमीला हिंन्दु मुस्लिम शिख इसाई हम है भाई – भाई यांचे एकता चे झाले दर्शन

भंडारा जिल्हा मुस्लिम लायब्ररी चौकात सर्व धर्म समभाव असल्याचे झाले दर्शन

श्रीराम नवमीला हिंन्दु मुस्लिम शिख इसाई हम है भाई – भाई यांचे एकता चे झाले दर्शन

भंडारा जिल्हा मुस्लिम लायब्ररी चौकात सर्व धर्म समभाव असल्याचे झाले दर्शन श्रीराम नवमीला हिंन्दु मुस्लिम शिख इसाई हम है भाई - भाई यांचे एकता चे झाले दर्शन

✍ भवन लिल्हारे ✍
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8308726855,8799840838

भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील मुस्लिम लायब्ररी चौकात दिनांक १० एप्रिल २०२२ रोज रविवारला श्रीराम नवमी जन्मोत्सवाचे औचीत्य साधून जिल्ह्यातील विविध धर्म ‘ जातीपात न पाहता सर्वधर्म समभाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धोरणाची उमद्या तरुणांनी साथ देऊन येथील मुस्लिम लायब्रेरी चौकात शोभायात्रेतील भावीकांना सरबत व महाप्रसादचे वाटप केले. या उपक्रमाच्या निमित्ताने भंडारा वासी यांना मुस्लिम लायब्रेरी चौकात हिन्दु मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडले. श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने सर्व धर्मसमभाव काय असतो. हे या तरुणांनी दाखऊन दिले. उल्लेखणिय म्हणजे इफ्तारची वेळ झाली असतांनाही हिंदू भाविकांसाठी मुस्लिम भाविकांनी सरबत व अन्य पदार्थांचे वितरण केले. या कार्यक्रमा प्रसंगी वसीम ( टिंकू ) खान, नितीन दरगकर जनेद खान, संजय चौधरी, नितेश नागदेवे, रोशन येरणे, अरविंद भूरे, राजिव देशाई, सुफियान खान, फराज खान, बबलु खान, फजिल खान, अमित दलाल, गब्बर बनकर, रिजवान चव्हान, अर्जून दुरगकर, अनिस खान, गुडडू खान, अजिम खान, रजा खान, व संपूर्ण मित्रपरीवार यांनी सहकार्य केले.
चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचांगानुसार अत्यंत महत्वाचा दिवस आहे. या तिथिला भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या जाणाऱ्या प्रभू रामचंद्राचा जन्म झाला. या दिवसाला ‘ रामनवमी ‘ असे म्हणतात. दिनांक १० एप्रिल २०२२ रविवार रोजी भंडारा वासी रामभक्त तरुणानी खात रोड ते बहीरंगेश्वर व्यायाम शाळा येथून मोठ्या थाटामाटात श्रीराम नवमीची भव्य रॅली काढली. या रॅलीत रथयात्रा व राम, सिता, लक्ष्मण, व भगवान हनुमान यात्रा काढण्यात आली. संपूर्ण भंडारा शहरात ही रॅली मोठ्या संख्येने संपूर्ण चौकात फिरत फिरत आपल्या स्थळी आली. या भव्य श्रीराम रॅलीचा आनंद भंडारा शहर ग्रामीण, व तरुण तरुणी, युवक युवती व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढविली.
व नंतर महाप्रसाद वाटप करून कार्यक्रम समाप्त करण्यात आले. आयोजक कार्यकर्त्यांनी सर्वांचे आभार मानले व दरवर्षी श्रीराम नवमी साजरी करू असे आव्हाहन देऊन कायक्रम इथेच संपला असे जाहीर करून समाप्ती केली.