कर्नल विल्यम लॅम्बटन स्मृतिस्थळ होणार विकसित निसर्गसाथी फाउंडेशन चा पुढाकार, आमदार समीर कुणावार यांची ग्वाही

कर्नल विल्यम लॅम्बटन स्मृतिस्थळ होणार विकसित
निसर्गसाथी फाउंडेशन चा पुढाकार, आमदार समीर कुणावार यांची ग्वाही

कर्नल विल्यम लॅम्बटन स्मृतिस्थळ होणार विकसित निसर्गसाथी फाउंडेशन चा पुढाकार, आमदार समीर कुणावार यांची ग्वाही

✒करण विटाळे✒
हिंगणघाट तालुका ग्रामीण
प्रतिनिधी: 8806839078

हिंगणघाट:१३ एप्रिल,
शहरातील द ग्रेट ट्रिगनोमेट्रीकल सर्वे ऑफ इंडिया चे जनक लेफ्टनंट कर्नल विल्यम लॅम्बटन यांचे स्मतिस्थळाकडे दर्लक्ष झाल्याने शहरातील ऐतिहासिक वारसा लुप्त होऊ नये याकरीता निसर्गसाथी फाउंडेशन चे वतीने दि १२ ला लेफ्टनंट कर्नल विल्यम लॅम्बटन@२०० कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी बोलताना आमदार समीर कुणावार म्हणाले की कर्नल विल्यम लॅम्बटन यांचे स्मतिस्थळ विकसित करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करुन आगामी काळात स्मृतिस्थळ सुशोभित करुन ऐतिहासिक वारसशाची शहरासह जिल्ह्यात, राज्यात ओळख निर्माण व्हावी यासाठी समाधी स्थळाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे चे बोलताना म्हणाले .
कर्नल विल्यम लॅम्बटन@ २०० कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आमदार समीर कुणावार,प्रमुख अतिथी नायब तहसीलदार समशेर पठान यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक निसर्गसाथी फाउंडेशन चे अध्यक्ष प्रवीण कडु यांनी याप्रसंगी जनता कालेज चंद्रपूर चे प्रा डॉ योगेश दुधपचारे ,यशवंत महाविद्यालय वर्धाचे डॉ.बुद्धघोष लोहकरे यांनी कर्नल विल्यम लॅम्बटन यांचे भारताच्या ट्रिगनामेंट्रीकल सर्वेक्षणाचे योगदान विषद केले. निसर्गसाथी फाऊंडेशन ने केलेल्या मागणी प्रमाणे नायब तहसीलदार समशेर पठान यांनी कर्नल विल्यम लॅम्बटन स्मृतिस्थळावर दरवर्षी 10 एप्रिल राष्ट्रीय सर्वेक्षण दिवशी प्रशासनाचे वतीने मानवंदना देण्यात येईल असे सांगितले.
कार्यक्रम वर्धा, चंद्रपूर, नागपुर, यवतमाळ येथील महाविद्यालयीन विद्यार्थी तथा प्रा डा योगेश दुधपचारे,प्रा‌ डॉ बुद्धघोष लोहकरे प्रा विजय वानखेडे,प्रा‌ अजय सोळंके,प्रा डॉ दिलीप चौधरी,प्रा‌ सुरेश चोपणे यांच्या सह शहरातील पर्यावरण संवर्धन संस्था ,वणा नदी संवर्धन समिती ,जय भवानी बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य , समाजसेवक सुनील डोंगरे, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रा अभिजित डाखोरे यांनी तर आभार निसर्गसाथी नियाजुद्दीन सिद्धीकी यांनी मानले.
‌कार्यक्रमाचे यशस्विते करीता निसर्गसाथी फाउंडेशन चे अध्यक्ष प्रवीण कडु, प्रा डॉ बालाजी राजुरकर, प्रभाकर कोळसे, राकेश झाडे, गुणवंत ठाकरे,नियाजुद्दीन शिद्धीकी, राजश्री विरुळकर,प्रा सुलभा कडु,करण विटाळे , चैतन्य वावधने आदींनी परिश्रम घेतले.