इंदिरा गांधी महाविद्यालय गडचिरोली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.
✍ विनोद कोडापे✍
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
📱8380802959📱
गडचिरोली :- गडचिरोली एकता सामाजिक शिक्षण संस्था गडचिरोली द्वारा संचालित इंदिरा गांधी महाविद्यालय गडचिरोली च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमात महाविद्यालयाचे व्यवस्थापक सुनील गोंगले हे अध्यक्ष स्थानी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. दिपक ठाकरे (NSS अधिकारी) , व प्रा. विशाल भांडेकर आदीं मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील गोंगले यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा याचे महत्त्व सांगून महान व्यक्तीने केलेल्या कार्याचा वसा घेऊन समाजात जीवन जगावे असे पटवून दिले. तसेच प्रा. दिपक ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. व असे आव्हान उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाची विद्यार्थीनी कु. हरिता कोरेटी यांनी केले. तर आभार प्रा. विशाल भांडेकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे वलंटीयर विजय मोहुर्ले, सचिन वड्डे, राजू दामले, अखिल कुमरवर, अभिषेक कांडो, विक्की आरेकर, कु. स्वाती कुमेटी, तृप्ती सोमनकर इत्यादींनी सहकार्य केले.