भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त नागभीड तालुक्यातील कांपा येथे शोभायात्रेत आ. बंटीभाऊ भांगडीया यांची उपस्थिती.
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभिड–दि. १४ एप्रिल/ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त नागभीड तालुक्यातील कांपा येथे शोभायात्रेला आ. बंटीभाऊ भांगडीया यांनी भेट दिली.
सदर, शोभायात्रेत आ. बंटीभाऊ भांगडीया यांनी सहभागी होऊन भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेला अभिवादन केले व शोभायात्रेतील उपस्थित नागरिकांशी वार्तालाप केला.
यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजूकर, ईश्वर मेश्राम, बालू मेश्राम, राजू मेश्राम, गोलू गेडाम, जगदीश खोब्रागडे, डोमा मेश्राम, शोएल शेख, किर्तीवन आत्राम, सुरज हुमने व इतर भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.