सावरगाव- गिरगाव बायपास मार्गाचे डांबर उडून रस्ता उखळलला
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभीड —तालुक्यातील सावरगाव- गिरगाव बायपास मार्गावरील डांबर केव्हाचेच उडले असून जागोजागी खड्डे पडले असल्याने या मार्गांवरून वाहन चालविताना शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहे. गिरगांव,नवरगावला जाण्यासाठी सदर मार्ग अत्यन्त सोयीचा व जवळचा मार्ग आहे. मात्र या रस्त्यावरील संपूर्ण डांबर नाहीसा झाल्याने कित्येक वर्षांपासून रस्ता उखळलेल्या अवस्थेत सुरु आहे.
गिरगांव,नवरगावला जाण्यासाठी पश्चिमेला चिखलगाव फाट्यावरून जावे लागते. मात्र सावरगाव हुन अगदी जवळच गिरगांव कडे जाण्यासाठी एक बायपास मार्ग आहे. पुर्वी हा डांबरीकरणाचा मार्ग होता. मात्र बऱ्याच वर्षांपासून या मार्गांवरील डांबर नाहीसे झाले असून आता खडिकरणाचा रस्ता असल्याचे जाणवत आहे.आणि जागोजागी खड्डे पडलेले आहे. दरम्यान बारीक दगडं पसरलेल्या यां मार्गांवरून वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. रस्ता कमी अंतराचा असल्यामुळे नाहक त्रास सहन करीत नागरिकांना या मार्गाने प्रवास करावा लागत आहे.मात्र बांधकाम विभागाचे या महत्वाच्या रस्त्याकडे लक्ष जात नसल्याने बऱ्याच वर्षांपासून सावरगाव – गिरगांव हा बायपास मार्ग आहे त्याच स्थितीत अंगावरील डांबर झाडून बसला आहे.बांधकाम विभागाने याकडेही थोडे लक्ष घालावे.व या मार्गाचे डांबरीकरण करावे अशी नागरिकांची मागणी आहे.