प्रख्यात साहित्यिक राजेश बारसागडे यांना ‘आदर्श सेवा सन्मान पुरस्कार’

प्रख्यात साहित्यिक राजेश बारसागडे यांना ‘आदर्श सेवा सन्मान पुरस्कार’

प्रख्यात साहित्यिक राजेश बारसागडे यांना 'आदर्श सेवा सन्मान पुरस्कार'

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731

नागभिड– तालुक्यातील सावरगाव येथील प्रख्यात साहित्यिक, लोकमतचे वार्ताहर तथा सामाजिक कार्यकर्ते राजेश देवराव बारसागडे यांना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील आय.एस.ओ.नामांकन प्राप्त एका दैनिका तर्फे वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्य सामाजिक सेवा या कार्यासाठी ‘आदर्श सेवा सन्मान पुरस्कार’ देऊन बुधवारी सन्मानित करण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यतील एका वृत्तपत्राचा वर्धापन दिन सोहळा नुकताच पार पडला.या सोहळ्याचे औचित्य साधून काही समाज सेवकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. यामध्ये नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील प्रख्यात साहित्यिक,लोकमत चे वार्ताहर, सामाजिक कार्यकर्ते तथा नागभिड तालुका पञकार संघ रं,न 9519महा461/05 संलग्न तळोधी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश बारसागडे यांना सामाजिक सेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना ‘आदर्श सेवा सन्मान पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार या दैनिकाचे नागभीड तालुका प्रतिनिधी योगेश्वर शेंडे यांनी कोजबी येथील सरस्वती विद्यालयाच्या संस्था सचिव श्रीमती मनीषा बारापात्रे यांच्या हस्ते एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांना प्रदान केला.पुरस्कारात सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ व सन्मानपत्राचा समावेश होता.
राजेश बारसागडे हे एक प्रसिद्ध साहित्यिक असून लोकमत चे सावरगाव प्रतिनिधी आहेत. शिवाय त्यांचे सामाजिक कार्य सुद्धा उल्लेखनीय आहेत.त्यांच्या कोंबळा झाला बालकविता संग्रहास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी दिला जाणारा त्र्यंबक बापूजी ठोंबरे ‘बालकवी’ हा पुरस्कार मिळाला आहे.त्यांचे साहित्य महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा वृत्तपत्रात,साप्ताहिकात, नियतकालिकात,मासिकात प्रकाशित झालेले आहे.आणि त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा लाभलेले आहेत.त्यांचे ‘चार तरंग अस्वस्थतेचे’ चारोळी संग्रह, ‘कोंबडा झाला घड्याळ’ बालकविता संग्रह, ‘तू कधीच समजून घेतलं नाही’ हा ललित संग्रह असे एकूण तीन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.शिवाय शासनाच्या सामाजिक कार्यातील अनेक पदांवर सुद्धा त्यांनी कार्य केलेले आहे.कोरोना काळातही त्यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय राहिले आहेत. कुणाच्याही,कुठल्याही कामासाठी धावून जाण्याची त्यांची वृत्ती आहे. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाला सदर पुरस्कार मिळाल्याचे सार्थ झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले आहे.