हिवरखेड येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर 131 वी जयंती तसेच श्री भगवान महावीर जयंती साजरी
✍ हर्षल पाटील ✍
मोर्शी तालुका प्रतिनिधी
📱 8600650598 📱
मोर्शी ( हिवरखेड ) : – दि, 14,04,22 ला हिवरखेड यथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर समिती तर्फे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य शोभायात्रा चे आयोजन केले तसेच शोभायात्रा बुद्ध विहार येथून महात्मा फुले हायस्कूल येथे महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याचे पूजन करून पूर्ण गावाला फेरी मारली तसेच ढेरा चौक येथे शिव फुले शाहू आंबेडकर समती तर्फे मिरवणुकीतील लोकांना शरबत वाटप करण्यात आले तसेच डॉ, बाबासाहेब आंबेडकर तसेच श्री भगवान महावीर याच्या फोटोचे पूजन व हारारर्पण करण्यात आले शोभायात्रा बुद्ध विहार यथे पोहचल्यावर डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चारित्र्य लोकांना पटवून देण्यात आले तसेच भगवान महावीर यांची जयंती दिगम्बर जैन मंदिर येथे श्री भगवान महावीर यांच्या फोटोचे पूजन करून भजनाचा कार्यक्रम करण्यात आला
सर्व हिवरखेड ग्रामवासी कार्यक्रमाला उपस्थित होते