“वाचाल तर वाचाल’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर-एक चेतना सलग 24 तास वचन एक पाऊल पुढे चे आयोजन

वाचाल तर वाचाल’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर-एक चेतना सलग 24 तास वचन

एक पाऊल पुढे चे आयोजन

"वाचाल तर वाचाल' डॉ. बाबासाहेब आंबेडकर-एक चेतना सलग 24 तास वचन एक पाऊल पुढे चे आयोजन

✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर-8208166961

वर्धा : -सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की स्थानिक जय महाकाली शिक्षण संस्था वर्धा द्वारा संचालित अग्निहोत्री कॉलेज ऑफ फार्मसी, अग्निहोत्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, वर्धा आणि भारतीय विचार मंच च्या सयुक्त विद्यमानाने आमचे प्रेरणास्त्रोत संस्थाध्यक्ष मा.पं. श्री. शंकरप्रसादजी अग्निहोत्री यांच्या सहकार्यातून |आणि अग्निहोत्री कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ धर्मेंद्र मुंधडा सर यांच्या मार्गदर्शनात दि. 13-04-2022 (संध्या. 6.00 वा. पासून) ते 14-04-2022 (संध्या. 6.00 वा. पर्यंत) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती प्रीत्यर्थ ‘वाचाल तर वाचाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक चेतना सलग 24 तास वाचन एक पाऊल पुढे चे आयोजन केले होते. त्यात 113 विदयार्थीचा समावेश होता त्यापैकी 24 विदयाथांनी सलग 24 तास वाचन केले. या मध्ये अकोला चे श्रीनंदन नरेंद्र इंगळकर (इयत्ता 10 वी 15वर्ष), चैतन्य नरेंद्र इंगळकर (इयत्ता 6 वी 11वर्ष), तर अमरावती ची सुंदरा नरेश अनेरकर (इयत्ता 10 वी 15वर्ष) आणि गांधी सिटी पब्लिक स्कूल, चा ख्यि प्रशांत अतकरे (इयत्ता 8 वी 13वर्ष) यांचा उस्फूर्त असा प्रतिसाद मिळाला हे विशेष,
अग्निहोत्री पॉलिटेक्निक नागठाणा, अग्निहोत्री स्कूल ऑफ टेक्नॉलाजी, श्री शंकरप्रसाद अग्निहोत्री कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, तसेच अग्निहोत्री कॉलेज ऑफ फार्मसी, अग्निहोत्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, वर्धा यांचाही समावेश आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भारताचे संविधान व स्वातंत्र चळवळीत केलेले मौल्यवान योगदान लक्षात घेता आम्ही सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमात सर्व विद्यार्थांनी या स्पर्धेचा लाभ घेतला आणि उस्फूर्त असा प्रतिसाद दिला