गुरुकुंज आश्रमाचे नुतनीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार
अ भा गुरुदेव सेवा मंडळाची मध्यवर्ती प्रतिनिधी सभा सम्पन्न
✍हेमा मेश्राम✍
दुर्गापुर शहर प्रतिनिधी
73919 36394
चंद्रपूर : – वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्याची संधी मला अ भा गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून मिळाली याचा मला मनापासून आनंद आहे. नागपूर विद्यापीठाचा नामविस्तार करण्याच्या प्रक्रियेत मी संसदीय संघर्षाच्या माध्यमातून आपले योगदान देऊ शकलो याचे विशेष समाधान आहे.ज्या अपेक्षा आज या ठिकाणी व्यक्त करण्यात आल्या त्या पूर्ण करणे हे माझे कर्तव्य आहे. त्या साठी मी प्रयत्नांची शर्थ करेन. निष्काम भावनेने हे पद स्वीकारले त्या पदाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करेन अशी ग्वाही अ भा गुरुदेव सेवा मंडळाचे नवनियुक्त उपाध्यक्ष म्हणुन यावेळी दिली.
दि 15 एप्रिल 2022 रोजी अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी आश्रमात मध्यवर्ती प्रतिनिधी सभेत उपस्थित होतो. ही बैठक स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात होत आहे. ग्राम विकासाच्या दृष्टीने मुलभूत विचारांचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. इमारतीचे नुतनीकरण तसेच पुनःबांधणी
करण्यासाठी निश्चितपणे कालबद्ध कार्यक्रम आखू. महामार्गावर होणारे अपघात लक्षात घेता दारूबंदी कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. विधानसभेत या बाबत अशासकीय विधेयक आपण मांडणार असल्याचे यावेळी सांगितले. काल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती, आज हनुमान जयंती .बाबासाहेबांचा सामाजिक न्यायाचा व हनुमानजींचा सेवेचा विचार एकत्रितपणे पुढे नेण्यासाठी सिद्ध होऊ असेही मत यावेळी मांडले. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी अ भा गुरुदेव सेवा मंडळाच्या अध्यक्ष माजी आमदार सौ पुष्पाताई बोडे उपस्थित होत्या.
यावेळी प्रास्ताविकात श्री वाघ यांनी नागपूर विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी केलेल्या प्रयत्नांबाबत माहिती देत काही अपेक्षा व्यक्त केल्या.आश्रमाचे नूतनीकरण करण्या संदर्भात त्यांनी विशेष भर दिला.या भारतात बंधुभाव नित्य वसू दे ही सामूहिक प्रार्थना झाली. संचालन जनार्धनपंत बोथे यांनी केले. सभेला मध्यवर्ती प्रतिनिधी उपस्थित होते.